नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

दुनियादारी मराठी चित्रपट

सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी ‘ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. या मल्टी स्टार कास्ट चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, सई ताह्मणकर, उर्मिला कानेटकर, संदीप कुलकर्णी, सुशांत शेलार आणि वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. […]

क्रांतिकारक मंगल पांडे

३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. “मर्दहो, उठा !” अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!” […]

जयंत नारळीकर

आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. […]

प्रा. रंगनाथ पठारे

प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. […]

जागतीक इमोजी दिवस

सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माणसाच्या प्रत्येक भावनेसाठी आज इमोजी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर यांच्यामुळे इमोजी आताच्या काळात संदेश पाठवतानाच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत इतक्या की चक्क त्यांच्या साठी स्वतंत्र दिवस सुद्धा साजरा केला जातोय. […]

अमेरिकन ‘अपोलो- ११’

भारतीय वेळेनुसार २१ जुलै रोजी तेराव्या प्रदक्षिणेदरम्यान नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन ‘ईगल’मध्ये (चंद्रावर उतरणाऱ्या घटकाचे नाव) बसले आणि ‘ईगल’ संचालक घटकापासून वेगळे झाले. या संचालक घटकाचे नामकरण ‘कोलंबिया’ असे करण्यात आले होते. तिसरा अंतराळवीर कॉलिन्स हा कोलंबियामध्येच थांबून पृथ्वीप्रदक्षिणा करीत राहिला. दोन तास नऊ मिनिटांनी ‘ईगल’ चंद्रावरील ‘सी ऑफ ट्रँक्विलिटी’ या पूर्वनियोजित जागेवर हळुवारपणे उतरले तेव्हा अवघे २५ सेकंदांचे इंधन शिल्लक राहिले होते. […]

ज्येष्ठ अभिनेते डॉ.याकूब सईद

याकूब सईद पुण्यात शाळेत शिकत असताना दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’मध्ये शाळा शिकून ते काम करत असत. संध्याकाळी काम करायचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’,’ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या ते गाण्यांची पुस्तकं विकत असत.‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’असं करता करता ते एम.ए. झाले. […]

अभिनेता हॅरिसन फोर्ड

इंडियाना जोन्स ऊर्फ इंडी ही भूमिका फक्त हॅरिसन फोर्डनेच करावी. इंडीमधल्या कमतरता, त्याचा अभ्यासूपणा, अतिधाडसीपणा हॅरिसन इतक्या ताकदीने रंगवतो की तो निव्वळ ही भूमिका करणारा अभिनेता राहत नाही. हॅरिसन फोर्डच्या धाडसाबाबत बोलायचं तर सिनेमातले स्टंट तो करतो. फक्त सिनेमातलेच नाही तर प्रत्यक्षात अचाट साहस करतो. विमानं उडवणं त्याला आवडतं. एकदा त्याच्या विमानाला अपघात झाला तेव्हा त्याची प्रतिक्रीया मजेशीर होती. त्याला विचारलं नेमकं काय झालं. तो म्हणतो, मी ते (विमान) मोडलं. […]

भारतीय कसोटी पंच स्वरूप किशन

भारतीय आणि परदेशी खेळाडूंना ‘लेग स्टंप गार्ड’ देण्याची त्यांची पद्धत औरच होती. भारतीयांना मान हलवून तर परदेशींना बोट वर करून ‘लेग’ देत. असे का, हे विचारताच भारतीयांना ‘जपून रहा’ तर इतरांस ‘बाद हो’ असे मनात म्हणायचो, असे ते सांगत. […]

बॉबी तल्यारखान

पारसी समाजाचे भारतीय क्रिकेटला मोठे योगदान आहे. पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर हे दोन कर्णधार भारताला दिले ते पारशानीच. अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान हे सुद्धा पारशी. मंगेश पाडगावकरांसारखा जाड चष्मा आणि दाढी असलेले हे एक महान समालोचक होते. बॉबी तल्यारखाननी एकदा तंत्रशुद्ध फलंदाज विजय़ मर्चंटची खिल्ली उडवली होती. […]

1 193 194 195 196 197 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..