अभिनेते निळू फुले
वग असो, नाटक असो वा चित्रपट – स्वत:च्या खास शैलीने त्यांनी त्या त्या भूमिका अजरामर केल्या. केवळ चेहर्यांच्या संयत हालचाली, डोळे, पापण्या, ओठ, गाल अशा चेहर्यावरच्या सूक्ष्म हालचालींमधले संथ तरीही आशयसंपन्न फरक, त्यांच्या भूमिकेतून फार मोठा परिणाम साधत असे. सामाजिक समस्यांशी आणि त्यांच्या निराकरणासाठी झटणार्या निळू फुले यांना सामाजिक समस्यांना तोंड फोडणारी ‘सूर्यास्त’, ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’ यांसारखी मोजकी नाटके करायला मिळाली. पण त्यांनी सहजसुंदर अभिनयाने आणि अचूक निरीक्षणाने या नाटकातल्या भूमिकांना एका उंचीवर नेऊन ठेवले. […]