नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम उर्फ एल सुब्रह्मण्यम

लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम हे कुशल व्हायोलिन वादक म्हणून जगद्विख्यात आहेत. कर्नाटक शैली आणि पाश्चिमात्य शैली दोन्हींवर त्यांचं प्रभुत्व आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी लोकांसमोर आपली कला सादर करून आपल्या कुशलतेची चुणूक दाखवून दिली होती. एम.बी.बी.एस डॉक्टर असलेल्या एल. सुब्रह्मण्यम यांच्या दोनशेहून अधिक रेकॉर्डस् प्रसिद्ध झाल्या आहेत. […]

नामवंत प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अरविंद संगमनेरकर

महाराष्ट्रातील नामवंत प्रसूतीतज्ज्ञ, शतायुषी या मराठीतील सर्वाधिक खपाच्या दिवाळी अंकाचे संपादक आणि उत्तम लेखक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रसूतीतज्ज्ञ म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन दोन लाखांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी केली. […]

रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे

ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. […]

न्यू इंडिया ॲ‍ॅश्युरन्स कंपनीचा स्थापना दिवस

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी ही भारतातील सर्वांत जुनी व मोठी विमा कंपनी आहे. सर दोराबजी टाटा यांनी २३ जुलै १९१९ रोजी या कंपनीची स्थापना केली.z […]

आंबेडकरी नेते दादासाहेब रुपवते

ज्येष्ठ आंबेडकरी नेते आणि माजी मंत्री दादासाहेब_रुपवते यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२५ रोजी अकोले, अहमदनगर येथे झाला. दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते यांचे प्राथमिक शिक्षण अकोलेत व पुढील शिक्षण नाशिकला झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अर्थात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून दादासाहेब रुपवतेनी विद्यार्थी […]

भारतीय प्रसारण दिवस

आकाशवाणीवरून पहिल्यांदा बातम्या प्रसारित झाल्या त्या घटनेला ९७ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने भारतीय प्रसारण दिवस साजरा केला जातो. […]

अजित पवार

परिचितांमध्ये आणि कार्यकर्त्यांत त्यांची ओळख ” अजित दादा’ म्हणूनच आहे. अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील होत्या, तर शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते. […]

अप्रॉक्झिमेट डे

हावीपर्यंतच्या गणिताची ओळख असणा-या सर्वानाच ‘पाय्’ म्हणजे π ही संज्ञा नवीन नाही. वर्तुळाचा व्यास वा त्रिज्येवरून वर्तुळाचे परिघ व क्षेत्र काढण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो. आज २२ जुलै! म्हणजेच वेगळ्या स्वरूपात ही तारीख लिहायची झाली तर २२/७ अशी लिहितात. या संख्येला गणिती भाषेत ‘पाय्’ असे म्हणतात. […]

सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन

“विद्यया संपन्नता” हे ब्रीद घेऊन सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी, सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सोलापूर विद्यापीठ, अशी वेगळी ओळख असलेल्या  सोलापूर विद्यापीठाची स्थापना २२ जुलै २००४ रोजी झाली, व प्रत्यक्ष कामकाज ०१ ऑगस्ट २००४ पासून सुरू झाले. दुष्काळी व ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करुन, उच्च शिक्षणाची संधी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे विद्यापीठ करीत आहे. […]

अमेरिकेचा नॅशनल आइसक्रीम दिवस

आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो. आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो, आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. खाऊचा इतिहास माणसांच्या संस्कृतीइतकाच जुना आहे. या इतिहासाच्या पानापानावर आपल्याला अशी वळणं आढळतात जिथे जन्माला आलेला नवा पदार्थ म्हणजे त्या प्रदेशाची ओळख ठरावा. […]

1 2 3 4 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..