अभिनेते आनंद अभ्यंकर
‘कुर्यात सदा टिंगलम्’द्वारे त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले. […]