नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

जेष्ठ हार्मोनियमवादक पं. डॉ. विद्याधर ओक

डॉ. विद्याधर ओक म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वच म्हणावं लागेल. त्यांचा जन्म १५ जून १९५२ रोजी झाला. डॉक्टर, शास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक, लेखक, संगीत संशोधक, ज्योतिषशास्त्रज्ञ असं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व. गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. डॉ. विद्याधर ओक हे कलाक्षेत्राला ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि २२ श्रुतींचं अस्तित्व दाखवणारे संशोधक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय […]

ग्रिप्स नाट्य चळवळीचा सुवर्ण महोत्सव

मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आणि बालरंगभूमीचा आशय परीकथेच्या पुढे नेऊन ती सशक्त करण्यासाठी जगभरात उदयास आलेली ‘ग्रिप्स नाट्य चळवळ’ सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. ग्रिप्स नाट्यचळवळीत योगदान दिलेले जगभरातील रंगकर्मी जर्मनीची राजधानी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. ग्रिप्स नाट्यचळवळीचा पन्नास वर्षांचा आढावा, मुलांचे भावविश्व आणि नाटक यांवर विचारमंथन; तसेच विविध भाषांतील नाटकांचे सादरीकरण अशा उपक्रमातून ग्रिप्सचा सुवर्णमहोत्सव […]

मराठी अभिनेते, गीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले

श्रीरंग गोडबोले. खऱ्या अर्थाने चतुरस्र वल्ली. उत्तम लेखक… कवी… निर्माते… दिग्दर्शक आणि बरेच काही ! श्रीरंग गोडबोले हे खरोखर काव्यात्मक आविष्कार घडवू शकणारे रंगकर्मी आहेत. त्यांचा जन्म १५ जून १९६० रोजी पुणे येथे झाला. नाटक, सिनेमा अणि टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी पेक्षकांना गुंगवलेलं आहे. श्रीरंग गोडबोले यांनी एस.एस.सी. पर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. कॉलेज रुईया, झेविअर्समध्ये […]

किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे

अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. त्यांचा जन्म १५ जून १९३७ रोजी भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात […]

कवी, कथाकार अर्जुन उमाजी डांगळे

“पॉयझंड ब्रेड’ या त्यांनी संपादित केलेल्या दलित साहित्यविषयक ग्रंथाचा जागतिक साहित्य क्षेत्रातही नावलौकिक झाला. दक्षिण आफ्रिकेचे तेव्हाचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी, १९९८ मध्ये अर्जुन डांगळे दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा आपल्या आत्मचरित्राची प्रत सही करून दिली होती. […]

प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते. नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर […]

‘गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार

“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. […]

मराठी कवी सौमित्र उर्फ किशोर कदम

काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. […]

प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक उपेन्द्र लिमये

महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली. पठडीबाहेरील भूमिका करण्यासाठी उपेंद्र लिमये अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांनी “मुक्ता” या मराठी चित्रपटातून आपली चित्रपटसृष्टीतील कारकीर्द सुरु केली. […]

लोककवी मनमोहन नातू

मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत.
शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. […]

1 222 223 224 225 226 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..