जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट
तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते असे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचा जन्म १४ मे १६८६ रोजी झाला. डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट हे जरी जन्माने जर्मन असलेतरी शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले. इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ इव्हान्जेलिस्टा टोरीसेली यांनी १६४३ साली हवेचा दाब मापणाऱ्या एका साध्या यंत्राचा अर्थात वायूदाबमापकाचा शोध लावला. लवकरच असे लक्षात […]