नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा

शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ रोजी जम्मू येथे झाला. त्यांच्या आई गायिका उमा दत्त शर्मा यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास […]

गायक महेश काळे

शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. […]

जेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार

‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले. पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता. […]

प्रतिभावंत गायक कुमार गंधर्व

कुमार गंधर्व यांचा बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. १९३० आणि १९४० च्या दशकात […]

लेखक,राजकारी,कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ

काकासाहेब गाडगीळ हे राजकीय नेते म्हणून ओळख असणारे वैचारिक लेखक होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी झाला. ग्यानबाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्रविचार अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. १९६२ साली साताऱ्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. देशासाठी काकासाहेब गाडगीळ यांनी खूप काम केले पण कामाची प्रसिद्धी कधीही केली नाही. गंमतीचा भाग म्हणजे ‘प्रसिद्धीविना काम म्हणजे अंधारात मुलीला डोळा मारल्यासारखे […]

सामाजिक नेत्या, लेखीका, संपादक विद्या बाळ

विद्या बाळ या स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं कार्य करण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रमुख सामाजिक नेत्या आहेत. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला. ‘स्त्री’ व ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकांमधून सातत्याने लेख लिहून त्यांनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली आहे. स्त्र‌ियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरुषभान येण्याची आवश्यकता आहे,’ असे आग्रही प्रतिपादन करतानाच ते प्रत्यक्षात […]

बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक, लेखक,मा. ओ.पी. रल्हन

ओ पी रल्हन यांनी १९६० ते १९८० मध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटात अनेक नवीन कलाकारांना स्थान दिले. त्यांनी फूल और पत्थर धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या चित्रपट स्टार केले. काही लोक देव आनंद ने झीनत अमानला हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातून आणले असा गैरसमज आहे पण झीनत अमान ओ पी रल्हन यांनी प्रथम त्याच्या […]

आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी

मोगॅम्बो खूश हुआ’…’त्या’ भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. ‘मि. इंडिया’ या सिनेमात अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. […]

लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे

सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. सुमित्रा भावे या मुळच्या पुण्याच्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ रोजी पुणे येथे झाला. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातुन त्यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. […]

जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर

जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० गोव्यातील माशेल येथे झाला. मोहनदास सुखटणकर यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर […]

1 240 241 242 243 244 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..