बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट मास्टर अविनाश
बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट मास्टर अविनाश यांचा जन्म १ जानेवारी १९०९ रोजी मिरज येथे झाला. मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक […]