मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर
मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९००रोजी झाला. दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर […]