नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंतराव भोसले उर्फ वाय.जी. भोसले

त्यांच्या दिग्दर्शनाखाली अरुण सरनाईक, सूर्यकांत मांडरे, गणपत पाटील, राजशेखर, अभिनेत्री पद्मा चव्हाण, उमा, कामीनी भाटिया, संध्या रायकर, नीला गांधी, शांता तांबे, पद्मीनी बिडकर या कलावंतानी नाट्य कलेचे धडे घेतले होते. […]

अभिनेते व विनोदवीर वसंत शिंदे

गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले. […]

स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस

इम्पीरियल बॅक ऑफ इंडियाचे १ जुलै १९५५ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीयीकरण करून तिचे नामकरण ‘स्टेट बॅक ऑफ इंडिया’ असे करण्यात आले. या बैंकेची यशस्वी वाटचाल आजतागायत सुरु असून वर्तमान स्थितीत स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या देशभरांत आज २०,००० पेक्षा जादा शाखा देशाच्या सर्व काना कोपऱ्यांत कार्यरत आहेत, सरकारचे रिझ्व्ह बँकेचे समाशोधन सारखे व्यवहार स्टेट बँकेमार्फत होतात. […]

आमदार विनायक मेटे

पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड एकमेव विनायक मेटे याच्या नावावर आहे. […]

भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक, जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते अशी त्यांची ओळख होती. […]

जगविख्यात मुष्टियोद्धा माईक टायसन

टायसनने व्यावसायिक बॉक्सिंगचं जग आपलंसं केलं. पहिल्या १८ महिन्यांत त्याने २७ विजय मिळवले. २७ मधील २५ विजय नॉक आऊट होते . पुढे हेवीवेट अजिंक्यपदाच्या लढतीत टेव्हर बसिकला दोन फेऱ्यात लोळवलं आणि केवळ २० व्या वर्षी वर्ल्ड हेवीवेट चम्पिअनचा किताब मिळवून जगाच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाची मोहर उटविली. […]

केसरी टुर्स च्या संचालिका झेलम चौबळ

केसरीच्या संचालिका असलेल्या झेलम यांना फायनान्स, टिकिटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांमध्ये विशेष रुची आहे. मात्र, पर्यटनाच्या नवनवीन योजना आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेहमीच्या ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना पर्यटनाबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ॲग्रो टुरिझम, विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ टूर आणि कार्पोरेट क्षेत्रात विशेष लोकप्रिय असलेली माईस (MICE) अशा पूर्णपणे भिन्न आणि लोकप्रिय योजना आखण्याचे श्रेय ‘झेलम’ यांचेच. […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया-सुळे

निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार बाळासाहेबांना भेटायला गेले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देत असल्याचं बाळासाहेबांना सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, मग शिवसेना उमेदवारी देणार नाही. मध्येच शरद पवार म्हणाले, ‘पण भाजपाचं काय?’ बाळासाहेब म्हणाले, ‘कमळाबाईची चिंता नको करू, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे,’ असा शब्द बाळासाहेबांनी दिला. सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून आल्या. […]

ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेट चीनला परत दिले

पहिल्या अफू युद्धानंतर (१८३९–४२) हाँगकाँग बेट नानकिंग तहान्वये ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले. १८६० च्या दुसऱ्या अफू युद्धानंतरच्या पीकिंगच्या (बीजिंग) तहात ठरल्याप्रमाणे कौलून द्वीप-कल्पाचा प्रदेश ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच १८९८ च्या परिषदेत नमूद केल्याप्रमाणे त्याच वर्षापासून न्यू टेरिटरी प्रांतासह २३५बेटे ब्रिटनला ९९ वर्षांच्या करारावर चीनकडून मिळाली. अशा प्रकारे ब्रिटनने चीनकडून संपूर्ण हाँगकाँग प्रदेश हस्तगत करून येथे आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. […]

लेखिका रोहिणी निनावे

दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्श्नच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. […]

1 23 24 25 26 27 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..