नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

डॉ.पंजाबराव देशमुख

डॉ.पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई, हे त्यांचे पहिलेच अपत्य. राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. पण शिस्त फार कडक होती. त्यांना मुलांनी कसेही वागणे आवडत नसे त्यामुळे पंजाबराव यांना चांगले वळण लागले. पापळ ला १८७४ ला त्यांची शाळा सुरु झाली. १९०६ ला […]

प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब

प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि […]

पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत

पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत यांचा जन्म २७ डिसेंबर १९२३ रोजी झाला. मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक.१९५० ते २००७ या काळात मौज या संस्थेला स्वतःची प्रेस व फाउंड्री मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयामधून ही […]

चरित्रकार सुमती देवस्थळे

आज २७ डिसेंबर आज चरित्रकार सुमती देवस्थळे यांचा जन्म २७ डिसेंबर १९२७ रोजी झाला. सुमती देवस्थळे यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्ण भाषेत सर्वच चरित्रं अत्यंत लोकप्रिय झाली होती. टॉलस्टॉय एक माणूस, मॅक्झिम गॉर्की, छाया व ज्योती, एक विचारवंत (मार्क्स), अल्बर्ट श्वाइत्झर, सप्तर्षी आणि अरुंधती अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सप्तर्षी आणि अरुंधती या पुस्तकात त्यांनी आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा मांडल्या. […]

नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई

नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई यांचा जन्म २७ डिसेंबर १९०४ रोजी झाला. वसंत देसाई हे नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. १९६० साली बडोद्यात भरलेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली. वसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जात. विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे […]

महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ

‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव ‘अल्लाह वसई होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. नूरजहाँ यांचा जन्म पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला. संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती. नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. […]

नटसम्राट

४८ वर्षे झाली ’नटसम्राट’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला. २३ डिसेंबर १९७० रोजी धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व मा.पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची […]

मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर

आनंद अभ्यंकर यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. शाळा, महाविद्यालयात किंवा गणेशोत्सवात नाटक बसवून त्या माध्यमातून अभ्यंकर यांनी छोट्या-छोट्या नाटकांमधून मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांचा जन्म २ जून १९६३ रोजी झाला. त्यांची रंगभूमीच्या क्षेत्रातील खरी कारकीर्द पुण्याला सुरू झाली. गरवारे महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचेही शिक्षण घेतले. बजाज […]

राष्ट्रीय किसान दिन

जगभरात कृषि प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकर्यांाची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रातात प्रगति की अधोगती सुरू आहे. शेती उद्योगाला गती देण्यासाठी शेतकर्याससाठी कृषि व्याख्याने,या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्याा व्यक्तींचा सत्कार,कृषि प्रदर्शन,मेळावे आदि उपक्रम राबवणे गरजेचे आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा हा पन्नास टक्यांच्या आसपास होता.तो आज २२ ते २५ […]

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने चाळीस वर्षांचा प्रवास पूर्ण केलाय. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड स्थापना २३ डिसेंबर १९७७ रोजी झाली. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी ऊर्जा कंपनी ठरली आहे. २०१६ वर्षाच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदा पाच स्थानांची झेप घेतली आहे. आता रिलायन्सच्या पुढे रशियाची गॅस कंपनी […]

1 249 250 251 252 253 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..