रत्नाकर मतकरी
रत्नाकर मतकरी यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. रत्नाकर मतकरी गेली अनेक वर्षे अविरत लेखन करणारे नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु, साहित्यिक, स्तंभलेखक, चित्रकार, चित्रपट व मालिका लेखक, एकपात्री कथाकथनकार अशा विविधांगी भूमिका लीलया निभावणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. प्राथमिक शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये तर माध्यमिक शिक्षण राममोहन इंग्लिश स्कूल मध्ये झालं. १९५४ साली एस. एस. […]