संतकवि कृष्णदयार्णव
हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते. याचा जन्म सन १६७४ च्या अक्षय्य तृतीयेस झाला. याचें लग्न लवकर झालें होतें. या वेळीं महाराष्ट्रांत औरंगझेबाच्या स्वारीमुळें सर्वत्र धुमाकूळ माजला होता. त्यामुळें नरहरीला गांव सोडावा लागला. तो जोगाईच्या आंब्यास राहिला […]