नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे

अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला. अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर […]

मराठीतील रुबाबदार नायक अरुण सरनाईक

एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव अरुण सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. […]

जागतिक संगीत-दिन(वर्ल्ड म्युझिक डे)

जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डे ला म्युसिक्यू असे संबोधितात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती. ‘युनेस्को’च्या जगभर शांती प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टातून, संगीत विशारद लॉर्ड मेहुदी मेनुहीन यांनी १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिवसाचा प्रारंभ केला होता, […]

गोड चेहऱ्याचा अभिनेता अरविंद स्वामी

कधीच प्रसिद्धीसाठी काम न करणारा अभिनेता म्हणून अरविंद स्वामी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जून १९७० रोजी झाला. कॉलेज करताना पॉकेटमनी म्हणून मॉडेलिंग करत असताना मणीरत्नम यांची नजर अरविंद स्वामी यांच्यावर पडली. मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद स्वामीने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. आणि एका रात्रीत अरविंद स्वामी स्टार बनले. १९९५ मध्ये त्यांनी […]

राज कपूर निर्मित — दिग्दर्शित “संगम” चित्रपट प्रदर्शनाला ५४ वर्षे झाली

प्रदर्शित तारीख १८ जून १९६४ राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वत: राज कपूर, वैजयंतीमाला व राजेंद्र कुमार ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. संगमचे कथानक प्रेम त्रिकोणावर आधारित असून हा चित्रपट तब्बल ४ तासांचा आहे. संगम राज कपूर यांनी निर्मिती केलेला पहिलाच रंगीत चित्रपट होता. साने गुरुजींच्या ‘तीन मुले’ या कथेची साधारण कल्पना घेऊन […]

जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ

अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाच्या घराण्याशी थेट संबंध होता. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील पद्मविभूषण अल्लाउद्दीन खाँ हे त्या काळातील भारतीय संगीतातील एक अग्रणी व्यक्तित्व होते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे वडील व काका फकीर अफताबुद्दीन यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. बारा वर्षांहून अधिक काळ दिवसाला १८ तासांहून अधिक […]

जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल

मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला. १९३४ मध्ये […]

प्रसिद्ध लेखक, निर्माते आणि वितरक शरद पिळगावकर

शरद पिळगावकर यांचे गाव ‘पिळगाव’. मा.शरद पिळगावकर मुंबईत छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिन यांच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या पिळगावकरांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या […]

बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्ती यांनी बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून अभिनयाचे अधिकृत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला.करिअरच्या सुरूवातीला ऍक्शन आणि डान्ससाठी मिथुन चक्रवर्ती यांची खास ओळख निर्माण झाली होती. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांनी खऱ्या अर्थाने डान्सिंग स्टार बनवले. तर मृगया या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतो. मिथुन चक्रवर्ती […]

1 262 263 264 265 266 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..