डॉ. विजया विजय वाड
डॉ. विजया वाड या लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९४५ रोजी झाला. त्यांनी मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा आणि प्रमुख संपादिका म्हणून काम पाहिलं आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्या लेखन करत असतात. ‘आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान’ या विषयात त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांनी मराठी भाषा प्रकल्पांतर्गत भाषा शुद्धी प्रकल्प, […]