मराठी चित्रपट संगीत आणि भावगीत गायिका मालती पांडे
मालती पांडे यांच्या घरात संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९३० रोजी झाला. लहानपणापासूनच गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मालती पांडे यांनी त्रिवेदी सर व नाशिकचे भास्करराव घोडके यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. किशोरवयातच त्या गाण्याच्या बैठकी करू लागल्या. महाविद्यालयात असताना ”घराबाहेर ”या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्यामुळे प्रभातच्या ”आगे बढो”साठी सुधीर फडके यांनी मालती बाईना बोलावले. […]