साधना शिवदासानी
वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी “फॅशन आयकॉन‘ म्हणून ओळखल्या जाणारी गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी नय्यर तथा साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून साधना यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे […]