नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

दिग्दर्शक, निर्माते किरण शांताराम

१९७५ साली साहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांतारामबापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. १९७६ साली जगदीश खेबुडकरांचे संवाद व गीते आणि राम कदम यांचे संगीत असलेला ‘झुंज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. […]

पहिली ग्रँड प्रिक्समोटर रेसिंग

या अनोख्या कार रेसिंगच्या प्रकारात पहिल्यांदाच ३४ संघांनी आपल्या गाड्या उतरवल्या, त्यापैकी २५ कार हे फ्रान्सच्याच होते.सहा कार इटलीहून आणि तीन कार जर्मनीहून आल्या होत्या. गोर्डन बेनेट कप बंद झाल्याच्या निषेधार्थ ब्रिटनने यावर बहिष्कार टाकला. अशा प्रकारे, ती तीन देशांमधील स्पर्धा बनली. या कार्यक्रमात प्रवेशासाठी २०० पौंड फी ठेवली गेली होती आणि सर्व खर्च अंदाजे दहा हजार पौंड झाला होता. या शर्यतीत भाग घेण्यासाठी, ड्रायव्हरसह कारच्या वजनाची स्थिती १००० किलोपेक्षा जास्त नसावी ही अट होती. […]

जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिन

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, चीन येथे हुमेन या गावी फार मोठ्या प्रमाणात ओपियमची (खसखस) शेती केली जात होती. याच ओपियमच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात विविध ड्रग्ज (अंमली पदार्थ) बनविण्यासाठी व्हायचा. याच्या विरोधात लिन झीयू या व्यक्तीने खूप मोठे आंदोलन तेथे उभे करून यशस्वी केले. याच कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्या सन्मानार्थ २६ जून १९८९ पासून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येऊ लागला. […]

गोवा मुक्ती मोर्चा सेनानी पद्मश्री मोहन रानडे

गोवा मुक्ती संग्रामातील रानडे यांची कामगिरी धाडसी आणि रोमांचक अशी होती. त्यांनी शिक्षक म्हणून गोव्यामध्ये आपले बस्तान बसवले आणि पोर्तुगीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. या कारवायांमध्ये बेती येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर या कारवाईविरोधात त्यांना अटक झाली. त्यानंतर पुर्तुगीज पोलिसांनी त्यांना पोर्तुगालमधील लिस्बन येथे तुरुंगात ठेवले. […]

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन

दुसऱ्या महायुद्धानंतर निवडून आलेल्या क्लेमंट ऍटर्लीच्या मजूर पक्षाच्या शासनाने भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले. हे मोठे जटील काम होते तसेच मुस्लिमांच्या मागणीप्रमाणे वेगळे राष्ट्रही निर्माण करायचे होते. ही कामगिरी लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर सोपविण्यात आली. मार्च १९४७ मध्ये ते शेवटचे व्हाइसराय म्हणून भारतात आले. त्यांनी ३ जून १९४७ रोजी भारतास १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. […]

जागतिक कोड दिन

त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते. […]

अभिनेता पराग बडेकर

आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली. “मृगजळ”, “उन्मेष” यांसारख्या अनेक नाट्यस्पर्धांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. […]

भारताने पहिला विश्वचषक जिंकला

१९८३ ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. […]

भारतीय कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा झाला

हा सामना तीन दिवसांचा होता. मध्यमतेज गोलंदाज मोहंमद निसार यांनी (९३-५) सलामीवीरांना झटपट माघारी धाडल्याने पहिल्या तासातच ३ बाद १९ अशी यजमानांची वाईट अवस्था झाली. […]

पंडित शरद जांभेकर

आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती. […]

1 27 28 29 30 31 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..