नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीत हॅपी गो लकी म्हणून ओळख असलेल्या शशी कपूर यांनी कपूर घराण्याचा कोणताही स्तोम माजवला नाही. त्यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकता येथे झाला. बलवीरराज अर्थातच शशी कपूर हे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा. घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. बहुतेक लोकप्रिय चित्रपटांमधून शशी कपूर असेच दिसले. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी आणि बघता […]

ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ गायक काशिनाथ बोडस

काशिनाथ बोडस यांच्या घरातच गायनाची समृद्ध परंपरा होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९३५ रोजी झाला. तात्या उर्फ पं. काशिनाथ शंकर बोडस हे ग्वाल्हेर घराण्याचे गायन होते. काशीनाथ बोडस यांचे वडील पं. शंकर श्रीपाद बोडस व काका लक्ष्मणराव बोडस हे विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते. काशीनाथ बोडस हे सुरूवातीस तबल्या कडे आकर्षित झाले, पण नंतर त्यांनी गायन शिकण्यास आपल्या […]

तन्वीर सन्मान

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम यांचा तन्वीर हा एकुलता एक मुलगा. एका दुर्दैवी अपघातामध्ये त्याचे निधन झाले. तन्वीर याच्या वाढदिवशी त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ रंगभूमीच्या संदर्भात अखिल भारतीय स्तरावर महनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीला तन्वीर सन्मान प्रदान केला जातो. या वर्षीचा तन्वीर सन्मान ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, […]

कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश

कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते. कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ […]

जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल

मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला. १९३४ मध्ये सागर […]

फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ कलाकार ‘कॅब्रे क्विन’ हेलन

आपल्याला जरी त्या फक्त ‘हेलन’ म्हणून माहीत असल्या तरी त्यांचे पूर्ण नाव हेलन जयराग रिचर्डसन आहे व त्या जन्माने अॅग्लो बर्मीज. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ रोजी बर्मा मध्ये झाला. ती बॉलिवुड मध्ये त्यांच्या अनेक विवीध भुमिकांमुळे व विशेष करून नृत्याविष्कारामुळे ‘हेलन’ या भरपूर गाजल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित […]

फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ खलनायक प्रेमनाथ मल्होत्रा

प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: एकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी […]

ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे

दिलखुलास आणि प्रसन्न साहित्यिक शं. ना. नवरे यांनी कथा, ललित कथा, नाटक, ललित अशा सर्वच प्रांतांत संचार केला. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. मध्यमवर्गीय घरांतील सुख, दु:ख, वेदना त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांचे लेखन स्वप्नात रंगणार आणि सदैव जीवनावर प्रेम करणारे होते. स्वप्न संपले तर जगण्याचा अर्थच निघून जाईल, असे त्यांचे मत होते शंनांच्या लेखनानं वाचकांना कधी […]

जेष्ठ संगीतकार रोशन

रोशनलाल नागरथ ऊर्फ “रोशन” यांनी लहानपणीच प्रसिद्ध गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर बालगायक म्हणून संपूर्ण भारत दौरा केला. त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ रोजी गुजरानवाला येथे झाला. पुढे रविशंकर, अली अकबर खाँ, तिमिरबरन भट्टाचार्य यांचे गुरू असलेल्या उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे गायकी शिकण्यासाठी वर्षभर काढले. पण अल्लाउद्दीन खाँ साहेबांची त्यांच्या शिकवण्याव्यतिरिक्त आठ तास रियाझ करण्याची कडक शिस्त न मानवल्याने पळ […]

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी

त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे झाला. डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या “श्वास” आणि “डोम्बिवली फास्ट” या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक […]

1 289 290 291 292 293 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..