नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

शंकर जयकिशन या संगीतकारातील जोडीतील जयकिशन

जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. हा सुरांचा जादुगार! दुसरा शब्द नाही. जयकिशन लहानपणापासूनच ते हार्मोनियमवर गाणी वाजवत. सुप्रसिद्ध गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट्ट यांच्याकडे संधीसाठी चकरा मारत असतानाच त्यांची गाठ शंकर (शंकरसिंह रघुवंशी) या आणखी एका होतकरू संगीतकाराशी पडली. शंकरही संधीच्या शोधात फिरत होते. जयकिशन त्या काळी पृथ्वी थिएटरसाठीसुद्धा काम करत. […]

मराठी साहित्यिक सुभाष भेंडे

गोव्यातील बोरी हे मा.सुभाष भेंडे यांचे गाव. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे […]

नाटककार व साहित्यिक प्रा.दिलीप परदेशी

प्रा. दिलीप परदेशी यांचा कथा लेखना पासून प्रवास सुरु झाला. प्रा. परदेशी हे विलिंग्डन महाविद्यालयात सुमारे तीन वर्षे प्राध्यापक होते. त्या नंतर त्यांनी प्रदीर्घ काळ पुण्यात फर्गसन्‌ व बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन केले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचे आजोबा पैलवान मारुतराव परदेशी सांगलीतील बडे असामी होते. साहित्याच्या वंशपरंपरेपासून दूर असलेल्या परदेशी यांनी […]

इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ

इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५८ रोजी झाला. ते इटावा घराण्याचे सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. ते भारतात सर्वात सुप्रसिद्ध तरुण सतार वादक, मानले जातात. मुंबईत जन्मलेले शाहिद परवेझ यांचे वडील अजीज खान हे सुद्धा इटावा प्रतिनिधित्व करत असत. शाहिद परवेझ यांचे आजोबा सतार आणि सूरबहार वादक उस्ताद वहीद खान. अजीज खान यांनी […]

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू

तब्बूचं पूर्ण नाव तब्बसुम फातिमा हाश्मी आहे, मात्र लोक त्यांना तब्बू म्हणून ओळखतात. तिचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ रोजी झाला. तब्बूच्या आई वडिलांची फारकत झाली तेव्हा तब्बू खूप लहान होती, तब्बूने आपल्या वडिलांना पाहिलं नसल्याचंही सांगण्यात येतं. शबाना आझमींची पुतणी आणि फराहाची बहीण असल्याने तब्बूचे बालपणच ग्लॅमर जगतात गेले. वयाच्या १४ व्या वर्षीच तिने ‘हम नौजवान’ मधून पदार्पण केले […]

पहिल्या भारतातील बोलपटाचे जनक अर्देशीर इराणी

अर्देशीर इराणी याचे पूर्ण नाव खान बहादूर अर्देशीर इराणी. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १८८६ रोजी झाला. अर्देशीर इराणी यांनी भागीदारीत १९१४ मध्ये लोहारचाळ येथे अलेक्झांड्रा थिएटर घेतले. अर्देशीर इराणी यांच्याकडे ‘युनिव्हर्सल पिक्चर्स कॉर्पोरेशन’ या विदेशी सिनेवितरण कंपनीची एजन्सी होती. तेथे ते विदेशी चित्रपट प्रदर्शित करत. तेथे लागणारे बहुतेक इंग्रजी चित्रपट हे हाणामारीने भरलेले देमारपट, युध्यपट, स्टंट किंवा कामुक हावभावाचे […]

श्री के क्षीरसागर

श्री के क्षी. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक, विचारवंत श्री के क्षीरसागर यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९०१ रोजी सातारा जिल्ह्यातील पाली येथे झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. ते उर्दू शायरीचे अभ्यासक होते […]

प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर

हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या “प्रेमा तुझा रंग कसा’”’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा […]

हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेता म्हणून ज्यांना ओळखलेजाते अशा संजीव कुमार

संजीव कुमार या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले श्री हरिहर जरीवाला या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली. त्यांचा जन्म ९ जुलै १९३८ रोजी झाला. सुमारे २५ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी १५० पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ‘दस्तक’ आणि ‘कोशिश’ या चित्रपटांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. या […]

चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील

प्राथमिक शिक्षण तिथेच घेऊन पुढे मा.दिनकर पाटील हे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. कोल्हापूरला ते आपल्या मामाकडे राहात. त्यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातील बेनाडी या गावात झाला. दिनकररावांचे वडील दत्ताजीराव हे कोर्ट-कचेरीच्या कामासाठी कायम फिरस्तीवर असत. कोल्हापुरात त्या वेळी राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, सिटी हायस्कूल व विद्यापीठ हायस्कूल अशा शाळा होत्या. दिनकर द. पाटील […]

1 298 299 300 301 302 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..