नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

संगीत संशयकल्लोळची १०१ वर्षे

संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.तेव्हा रात्र रात्रभर नाटक चालत असल्याने तीस गाण्यांचे हे नाटकही त्या वेळी लोकांना खूप आवडले. तेव्हापासून आज शंभर वर्षांत हजारो प्रयोग होऊनही लोकांच्या मनावरची ‘संगीत संशयकल्लोळ’ची जादू ओसरलेली नाही. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला २० ऑक्टोबर २०१७ रोजी १०१ वर्षे झाली. […]

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे

सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले […]

‘गझल किंग’ जगजित सिंह

१९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले. […]

लेखिका प्रिया तेंडूलकर

विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार मा.विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका […]

प्रसिद्ध बंगाली व हिंदी अभिनेत्री सुमिता संन्याल

प्रसिद्ध बंगाली व हिंदी अभिनेत्री सुमिता संन्याल यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ रोजी दार्जिलिंग येथे झाला. सुमिता संन्याल यांचे खरे नाव मंजुळा संन्याल होते. पण पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःचे नाव सुचारिता असे ठेवले. पण फिल्ममेकर कनक मुखोपाध्याय यांनी तिचे नाव सुमिता केले. त्यांनी १९६० साली बंगाली चित्रपट ‘खोका बाबुर प्रत्याबर्तन’द्वारे चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. १९७० […]

राजकुमार

आज ‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या राजकुमार यांचा जन्म ८ आक्टोबर १९२६ रोजी झाला. राजकुमार उर्फ भूषण पंडित यांची ओळख विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी म्हणून अधोरेखित झाली. बी. आर. फिल्म निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्यांनी रहेमान […]

करवा चौथ

दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात. […]

’संगीतभूषण’ पं. राम मराठे

राम मराठे हे पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतबुवा मिराशी, मास्तर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खाँ व पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले. त्यांचा जन्म २३ आक्टोबर १९२४ रोजी झाला. पं गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. राम मराठे यांचे मंदारमाला हे नाटक पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, जयंतराव साळगावकर, गुणिदास, सी. आर. […]

अभिनेता सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधव हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा विनोदी अभिनेता. त्याचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबई येथे झाला. सिद्धार्थ जाधवने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकामधून प्रकाशझोतात आला. ‘हुप्प हुय्या’ मधील ‘हणम्या’, ‘दे धक्का’ मधील ‘धनाजी’, ‘लालबाग परळ’ मधला ‘स्पीडब्रेकर’, ‘मी […]

हिंदी चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा

यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते निवडली नाहीत. त्यामुळे सगळी इंडस्ट्री आनंद बक्षीची धूळ झाडत असतानाही चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही. […]

1 302 303 304 305 306 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..