नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शापित गंधर्व’ मानले गेलेल्या गुरुदत्त

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शापित गंधर्व’ मानले गेलेल्या गुरुदत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी झाला. गुरुदत्तचा सिनेमा हा अनेकांच्या आवडीचा विषय. लोकांनी त्याला शोमन, डिरेक्टर ऑफ मिलेनिअम अशा काही पदव्या दिल्या नाहीत. पण हिंदी सिनेमाच्या संवेदनशील रसिकांचा तो जिव्हाळ्याचा विषय. मग तो त्यांचा सिनेमा असो वा त्याचं वैयक्तिक आयुष्य. सिनेमा या माध्यमावरील पकड, संगीताची जाण आणि नव्या […]

मराठी कथक नर्तकी रोहिणी भाटे

मराठी कथक नर्तकी रोहिणी भाटे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला. रोहिणी भाटे यांनी आयुष्याची तब्बल ६५ वर्षे नृत्यक्षेत्रात मोठे योगदान दिले. ज्या काळात भारतात पांढरपेशा घरातील मुलींनी स्टेजवर नृत्य करणे ही प्रथा समाजमान्य नव्हती, त्या काळात एका मराठी मुलीने नृत्य करणे ही गोष्ट धारिष्ट्याचीच होती. पण एकदा घेतलेला निर्णय रोहिणी भाटे यांनी मरेपर्त्णत निभावला. […]

बॉलीवूडची शपित यक्षिणी अभिनेत्री रेखा

बॉलीवूडची शपित यक्षिणी अभिनेत्री रेखा यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी असलेल्या रेखा या गेल्या तीस वर्षांहूनही अधिक काळ बॉलीवूडमध्ये असून त्या अगदी सुरुवातीपासूनच आश्वासक अभिनेत्री म्हणून ओळखली गेली आहे. रेखा यांचे मुळ नाव भानुरेखा पण सिने सृष्टी साठी त्यांनी रेखा हे नाव धारण केले. १९७० […]

मेवाती घराण्याचे गायक संजीव अभ्यंकर

वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचे हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९६९ रोजी झाला. त्यांना सुरुवातीचे सांगीतिक धडे घरातून, आई शोभा अभ्यंकर यांच्याकडून मिळाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव देशपांडे यांनी त्यांना जसराजांकडे शिकायला पाठविण्याची शिफारस केली. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची संगीत दिनचर्या संपूर्णत: बदलली. गुरु-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू झाले. जसराजांच्याबरोबर […]

जेम्स बॉन्ड

गुप्तहेर म्हणजे बॉन्ड.. जेम्स बॉन्ड.. असे समीकरण असणा-या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातल्या जवळपास ५० टक्क्य़ांहून अधिक लोकांनी जेम्स बॉण्ड हे नाव ऐकलेलं आहे. जगातल्या इतर कुठल्याही चित्रपटाला बॉण्डपटांइतकी लोकप्रियता मिळालेली नाही. ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉन्डच्या पात्राला जन्म दिला आणि पाहता पाहता संपूर्ण जगभरातील सिनेचाहत्यांना बॉन्डपटाचे वेड लागले. […]

सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर

‘मराठी साहित्यात जोपर्यंत ललित नियतकालिकं चालू राहतील तोपर्यंत अनंत अंतरकरांचं नाव कायम टिकून राहील’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कै. अनंत अंतरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात काढले होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९११ रोजी जमखिंडी येथे झाला. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ ही अनंत अंतरकरांनी सुरू केलेली ललित नियतकालिके केवळ दर्जेदार साहित्याच्याच जोरावर आज ७० वर्षे झाली […]

गायक शैलेंद्र सिंग

बॉबी मधील गाण्याने ज्या ‘मैं शायर तो नहीं मगर ऐ हसीं’ या गाण्याने जी धमाल उडवली. या गाण्याचे गायकानी हे गाणे आपल्या जीवनात पहिल्यांदा गायले होते व जो या फिल्मी सृष्टीत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आला होता. त्यांचे नाव शैलेंद्रसिंग.त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. शैलेंद्र सिंग, यांचा जन्म मुंबईतलाच, कॉलेज झाल्यानंतर अभिनेता होण्याचे भूत त्यांच्या अंगात होते […]

ख्याल गायिकेतील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे

सरस्वती अब्दुल राणे! अर्थात..सरस्वतीबाई राणे! सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना उर्फ यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी रोजी झाला. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व […]

रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. अनंत दामले यांनी १९३० ते १९९० अशी जवळ-जवळ सहा दशके मराठी संगीत रंगभूमी आपल्या गायकीने व अभिनयाने ९२ नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका करीत समर्थपणे गाजविली. आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या काळात अनंत दामले यांनी अनेक भूमिका वठविल्या, परंतु […]

महेश एलकुंचवार

भारतीय नाटय़सृष्टीवर सर्जनशील लेखनाची छाप उमटवणारे नामवंत नाटककार आणि प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९३९ रोजी विदर्भातल्या पारवा या गावात झाला. त्रिधारा या नाट्य प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत. महेश एलकुंचवार यांचा जन्म तेलगु भाषक कुटुंबात झाला. त्यांची मातृभाषा तेलगूच. पारवा गावातच प्राथमिक […]

1 303 304 305 306 307 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..