प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान
प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून ‘स्थलांतरित’ होत होत हे वाद्य अमजद अलींच्या ‘बंगश’ घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे. वादनाची विशिष्ट पद्धत हे […]