नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मराठीतले प्रथम भावगीत गायक जी.एन.जोशी

मराठीतले प्रथम भावगीत गायक जी.एन.जोशी यांनी गायलेले रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत हे मराठीतले पहिले भावगीत समजले जाते. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला. […]

संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. […]

गायक, संगीतकार राम फाटक

रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील ‘तीर्थ विठ्ठल’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘पंढरी निवासा’, ‘अणुरेणीया थोकडा’ हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच ‘दिसलीस तू’, ‘डाव भांडून मांडून मोडू नको’ आणि ‘सखी, मंद झाल्या तारका’ ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली. […]

मराठीतील रुबाबदार नायक अरुण सरनाईक

हिंदी चित्रपटसृष्टी प्रमाणे आपल्याकडे रुबाबदार नायक अपवादानेच उदयास आले, असा टीकेचा सूरही आळविला जातो. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. या टीकेवर उत्तर म्हणजे अरुण शंकरराव सरनाईक हे नाव. एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता. अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका […]

संगीतसूर्य केशवराव भोसले

वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी झाला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सादर केले गेले. […]

गीतकार राजेंद्र कृष्ण

१९४४ मध्ये राजेन्द्र कृष्ण पटकथा लेखक गीतकार होण्यासाठी मुंबईत आले. त्यांचा जन्म ६ जून १९१९ रोजी झाला. गीतकार म्हणून पहिला चित्रपट १९४७ सालचा जंजीर चित्रपट होता. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर, कृष्णन गाणे सुनो सुनो हो दुनीयावालो बापू की ये अमर कहानी लिहिले. गाणे मोहम्मद रफी यांनी गायले होते. राजेंद्र कृष्ण यांना तामिळ सह अनेक भाषा येत होत्या, त्यांनी एव्हीएम […]

प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा

तनुजा यांचा जन्म एका चित्रपटसृष्टीशी निगडीत कुटुंबात झाला. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी झाला. बालपणी तनुजा यांना आई आणि आजीचे इतके प्रेम मिळाले, की ५० च्या दशकात त्यांना टॉम बॉय पुरस्कार मिळाला. त्या पार्टीमध्ये ग्लॅमरस ड्रेस परिधान करायच्या, खुलेआम सिगारेट आणि दारू पित होत्या. त्या काळातील ट्रॅडिशन अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या तनुजा बिनधास्त आयुष्य जगत. त्याचा परिणाम अनेकदा त्याच्या सिनेमांवरसुध्दा […]

कविवर्य प्रा.शंकर वैद्य

वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांना कवितेची गोडी लागली. यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी ओतूर पुणे येथे झाला. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते काव्यविश्वात रमले. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. तर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा ‘दर्शन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. […]

अलका कुबल

अलका कुबल यांना आपण ९० च्या दशकातील यशस्वी सिने अभिनेत्री म्हणून ओळखतो. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९६३ रोजी झाला. शालेय वयापासून नाटकाची आवड असलेल्या अलका कुबल यांनी शालेय स्पर्धांत काम तर केलेच, पण त्यानी महत्त्वाचे नाटक केले ते म्हणजे “नटसम्राट’. या नाटकात अप्पासाहेब बेलवलकरांच्या नातीची भूमिका त्यांनी वठवली होती. त्यानंतर “वेडा वृंदावन’ नाटकात काम केले. “नटसम्राट’मध्ये तर दत्ता भट […]

जेष्ठ समाज सेवक डॉ.अभय बंग

डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांनी वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण नागपूर येथे सुवर्णपदकासह पूर्ण केल्यानंतर आरोग्या समस्या सोडविण्यासाठी सहा वर्षे ग्रामीण भागात जाऊन काम केले. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० रोजी झाला.  डॉ. अभय बंग हे सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. सार्वजनिक आरोग्यसेवा परिणामकारकरीत्या कशी करावी, हे शिकवण्यासाठी त्यांनी […]

1 305 306 307 308 309 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..