एमबीए पदवीधर असणारी पहिली महिला सरपंच – छवी राजावत
मुंबईमधील मल्टीनॅशनल कंपनीत तगड्या पगाराची नोकरी सोडून राज्यस्थानच्या टोंक जिल्यातील सोढा पंचायतीची सरपंच छवी राजावत यांनी पूर्ण पंचायतीला आदर्श पंचायतमध्ये परिवर्तीत केले आहे. गावाच्या विकासासाठी त्या सरकारी पैशांवर निर्भर न रहाता, खाजगी क्षेत्रातून गुंतवणूकीची व्यवस्था करीत आहे. सोढा मध्ये पाणी, वीज, रस्त्यांच्या सुविधांचा अभाव या हद्दपार झालेल्या गोष्टी आहेत आता इथला ऐरणीचा विषय म्हणजे गावात बँक, एटीम, सौर उर्जा, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची सोय या व्यतिरिक्त जनावरांच्या चाऱ्यासाठी एखाद्या जागेची सोय. दिल्लीतील कॉलेज मधून आलेल्या मुलींशी गावातील स्त्रिया व मुली, मासिक पाळी व प्रसूती या मोकळेपणाने न बोलता येणाऱ्या विषयांवर चर्चा करू लागल्या. […]