नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र सदाशिव भट

साहित्याइतकीच अध्यात्माचीही ओढ असणाऱ्या रविंन्द्र भट यांनी एकूण १४ कादंबऱ्या, पाच नाटके, सहा काव्यसंग्रह व चित्रपट, अनुबोधपट, बालवाङमय असे विपुल लेखन केले. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. इंदायणी काठी, सागरा प्राण तळमळला, भगीरथ, आभाळाचे गाणे, देवाची पाऊले, भेदिले सूर्यमंडळा या त्यांच्या कादंबऱ्यांना वाचकांची विशेष पावती मिळाली होती. नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर […]

मराठीतील कवी वसंत बापट

वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी झाला. `माझीया जातीचे मज भेटो कोणी, ही माझी पुरवून आस, जीवीचे जिवलग असे भेटला की दोघांचा एकच श्वास’ अशी कवितेवर निष्ठा असणारा कवि म्हणून वसंत बापट ओळखले जातात. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा `बिजली’ हा पहिला काव्यसंग्रह सेतु, अकरावी दिशा, […]

मराठी कवी, गीतकार, ना.धों. महानोर

महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी […]

हिंदुस्तानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रख्यात गायिका सूरश्री केसरबाई केरकर

भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने भर घालणाऱ्या सूरश्री केसरबाई केरकर या गोव्याच्या भूमीकन्या. त्यांचा जन्म १३ जुलै १८९२ रोजी झाला. उस्ताद अब्दुल करीम खाँ, प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. १९२१ मध्ये त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खाँ यांचे शिष्यत्व पत्करले. त्या राजे – सरदार मंडळींसाठी नियमितपणे मैफिली करत असत. त्यांनी आपल्या गाण्याची […]

कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी

मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी या कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका होत्या. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे वडिल वीणा वादक तर आजी व्हायोलीन वादक होती. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा […]

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष

आपल्या कॅमेर्यारने सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५० रोजी झाला. व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेविअर्स हायस्कूल आणि पदवी शिक्षण सेंट झेविअर्स महाविद्यायतून झाले होते. आपल्या मितभाषी स्वभावाने, मृदू वाणीने आणि व्यक्तीतील मित्रत्वाचा शोध घेणार्याच दृष्टीने […]

लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी

अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा […]

प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पं. वामनराव सडोलीकर

पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला. पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या ‘गांधर्व महाविद्यालया’त मा.पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले. […]

मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर

केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर ऊर्फ दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणाऱ्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा […]

संगीतकार जोडी अजय-अतुल (गोगावले)

सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे. या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बमने केली. विश्वविनायक या अल्बममध्ये पारंपरिक आरती, […]

1 309 310 311 312 313 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..