नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके

प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके (Shridhar Phadke) यांचा जन्म ९ सप्टेंबर १९५० रोजी झाला. मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. […]

ख्यातनाम आसामी गायक आणि संगीतकार भूपेन हजारिका

हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पी.एच.डी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. यात सिनेमाच्या माध्यमातून विकास हा विषय त्यांनी निवड होता. […]

चिरतरुण, चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले

आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे.त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. ८५ व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा…’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे. आशाताई […]

हिंदुस्थानी संगीतपरंपरेतील एक थोर, प्रतिभावंत गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे घराणे भिक्षुकांचे. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १८४९ रोजी मिरजजवळील बेगड येथे झाला. त्यांचे वडील रामभट,यांनी भिक्षुकी सोडून साताऱ्याचे बाळाजीबुवा यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. आपल्या मुलानेही गाणे शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती. वयाच्या पाचव्या वर्षी बाळकृष्णाला त्याची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्याचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले. बाळकृष्णाला भिक्षुकीची गोडी […]

ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक बी. आर. इशारा

हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. इन्साफ का मंदिर चित्रपटातून लेखक म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ३४ चित्रपटांपैकी बहुतेकांचे लेखन त्यांनीच केले होते. त्यांनी १९६९ […]

गीतकार पी. एल. संतोषी

पी.एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच ‘अनोखे बोल’ हा गीतप्रकार ‘टिका लई कली दई’ (चित्रपट – शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला. ‘कोई किसीका दिवाना ना बने’ (सरगम), ‘महफिल में जल उठी शमा’ […]

बॉलिवूडचे अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन

राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून १९७० मध्ये ‘घर घर की कहानी’ या सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म ६ सप्टेबर १९४९ रोजी झाला. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास ४० सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘खुदगर्ज’ या सिनेमाद्वारे आपली सेकंड इनिंग सुरु केली. ‘काला बाजार’, ‘किशन कन्हैया’, […]

पहिल्या अभिनेत्री कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई गोखले

कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवावत. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. पण घराची हलाखीची अवस्था असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. आणि याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर संवाद,संगीत आणि […]

प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश जोहर

“कल हो ना हो ‘,” कुछ कुछ होता है’ यश जोहर,या ब्लॉकबस्टर चित्रपटचे निर्माते म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. त्याच्या चित्रपटात भव्य सेट्स आणि विदेशी ठिकाणी शुटींग केलेले चित्रपट ही त्याची खासियत होती. १९७७ साली यश जोहर यांनी त्यांच्या स्वत:च्या नावाने धर्म प्रॉडक्शन ही कंपनी सुरू केली. १९८० ते १९९० मध्ये […]

बालकुमार साहित्यिक लीलावती भागवत

लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९२० रोजी झाला.मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती […]

1 312 313 314 315 316 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..