कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा. गो. मायदेव
कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची ‘गाइ घरा आल्या’ ही सुंदर कविता. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला ‘वनमाळी’ मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन […]