शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर ! म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे बाबासाहेब […]