नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

गायिका गीता दत्त

गीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूड्सची आणि बाजाची गाणी गायिली. […]

पं. प्रभाकर कारेकर

पं. प्रभाकर कारेकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ शास्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. मूळचे गोव्याचे असलेले कारेकर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीची साधना करतात. […]

गझलसम्राट मेहंदी हसन

“पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, “अब के हम बिछडे‘, “रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, “तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या. […]

बॉलिवूडमधील ‘काका’ राजेश खन्ना

चालण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. […]

जेष्ठ गायिका मुबारक बेगम

‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तनहाईयो में’ आणि १९६५ मधील ‘खूनी खजाना’ या चित्रपटातील ‘ए दिल बता हम कहाँ आ गये’ या गाण्यांनी मुबारक बेगम यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. […]

मराठी गीतकार गुरु ठाकूर

गुरू ठाकूर हे नाव उच्चारले की त्यांनी लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची, बाजाची आणि ढंगांची गाणी रसिकांच्या ओठावर येतात. […]

पद्मजा फेणाणी-जोगळेकर

ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत. […]

देसी गर्ल प्रियांका चोपडा

चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रियांकाला सिंगिंगमध्ये करिअर करायचे होते. मात्र मिस वर्ल्डचा किताब २००० मध्ये जिंकल्यानंतर प्रियांका चित्रपटांकडे वळली. त्यामुळे म्युझिक बॅकफूटवर गेले. […]

ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-संगीतकार स्नेहल भाटकर

स्नेहल भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित […]

शांता हुबळीकर

चारचौघींसारखं साधं व्यक्तिमत्त्व असूनदेखील शांता हुबळीकर यांनी तीस-चाळीसच्या दशकातील मराठी रुपेरी पडदा चांगलाच गाजवला. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९१४ रोजी झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी काही कानडी नाटकात त्यांनी कामं केली व गायन देखील.पण त्यामध्ये उत्पन्न कमी असल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कालियामर्दन चित्रपटात अगदी छोटीशी भुमिका साकारली. याच दरम्यान कोल्हापूर […]

1 326 327 328 329 330 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..