नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे

पुण्यात वडिलांच्या नाटकांतून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या सतीश तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्त मुशाफिरी केली. ‘ऑल लाइन क्लीअर’ या सस्पेन्स कॉमेडीद्वारे त्यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम पदार्पणातच आपली नाममुद्रा उमटविली. […]

ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत

ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी धुळे येथे झाला. . तवडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर चंद्रकांत कामत यांनी बालनट म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नाटक कंपनीच्या दौऱ्यांमध्येच त्यांनी तबलावादकांकडून तबल्याचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. १९५५ मध्ये आकाशवाणीमध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि १९५६ पासून ते १९९१ अशी तब्बल पस्तीस वर्षे त्यांनी आकाशवाणीत […]

११ जुलै – जागतिक लोकसंख्या दिन

र. धों. (भारत), मार्गारेट सँगर (अमेरिका)आणि मेरी स्टोप्स (इंग्लंड) या तीन समकालीन व्यक्तींनी आपापल्या देशात साधारण शंभर वर्षांपूर्वी केलेलं कार्य म्हणजे आजच्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाची पायाभरणी होती. त्यांच्या कार्याचं पुण्यस्मरण करण्याचा हा दिवस. […]

जनजागृती

जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. […]

बॉलिवूड मधील ‘बाबूजी’ आलोकनाथ

आलोकनाथ हे नाव ऐकलं तरी आपल्यासमोर उभी राहते ती सोज्वळ अन्‌ शांत माणसाची प्रतिमा. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ-साथ है’ आणि ‘विवाह’ यांसारख्या हिट सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका साकारणारे आलोकनाथ प्रत्येक मालिका आणि सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका चोख पार पाडतात. […]

मराठी लेखक जी. ए. कुलकर्णी

निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व नगण्य बनविणार्याप नियतीला आणि तिच्या असीम शक्तीला जी.एं.नी आपल्या कथामधून बरेच प्राधान्य दिले असल्याचे आपणास पाहावयास मिळते. […]

गायक जयवंत कुलकर्णी

दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान जयवंत कुलकर्णींचा आहे. “ज्योतिबाचा नवस” आणि “एकटा जीव सदाशिव” या चित्रपटातील गाण्यासाठी .जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये गौरवण्यात आले होते. […]

अभिनेता संजीव कुमार

संजीव कुमार या नावाने प्रसिद्ध असलेले हरिहर जरीवाला या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली. […]

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम

तबस्सुम या जरी अभिनेत्री म्हणून आपण ओळखत असलो तरी त्या दूरदर्शन वरून १९७२ ते १९९३ सादर झालेल्या फूल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचल्या. […]

चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरूदत्त

गुरू दत्त! हिंदी चित्रपटसृष्टीतील आख्यायिका बनलेला चित्रपटकार, आपल्या चित्रपटांतून कलात्मकता आणि व्यावसायिकतेचा सुवर्णमध्य साधणारा संवेदनशील निर्माता-दिग्दर्शक (अन् अभिनेताही)! ‘चौदहवी का चांद‘, ‘कागज के फूल‘, ‘सीआयडी‘, ‘मि. अंड मिसेस ५५‘, ‘आरपार‘ आणि ‘प्यासा‘ यांसारख्या चित्रपटांनी चित्रपट समीक्षक, जाणकार तसंच सर्वसामान्य रसिकांना मोहिनी घालणारा प्रतिभावान चित्रपटकर्मी! […]

1 330 331 332 333 334 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..