नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे

करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या. […]

लोकप्रिय गायक नट श्रीपाद गोविंद नेवरेकर

मृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळ मधील आश्विनशेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या; तर स्वयंवरातील ‘जा भय न मम मना’, मृच्छकटिकातील ‘रजनीनाथ हा नभी उगवला’, सौभद्रातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, एकच प्याल्यातील ‘वसुधातल रमणीय सुधाकर व्यसनघनतिमिरी’, शारदेतील ‘बिंबाधरा मधुरा’ आणि संशयकल्लोळ मधील ‘कर हा करी धरिला शुभांगी’ ही त्यांनी गायलेली पदे श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारी होती. […]

गायक-अभिनेते गणपतराव बोडस

संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या. […]

बासरीचा बादशहा पंडित हरिप्रसाद चौरसिया

बासरी म्हटले की प्रथम पं. हरिप्रसाद चौरासिया हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. बांबूपासून बनविलेली बासरी हे वाद्य साधे वाटत असले तरी ते पंडित चौरसियांच्या हाती आल्यावर ते रसिकांना खिळवून ठेवणारे वाद्य बनते. या साधनेमुळे पंडित चौरसिया यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे. […]

प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान

शास्त्रीय गायनाला जगभरात नावलौकिक मिळवून देण्यास मोलाचे योगदान देण्यात राशिद खान यांचा मोठा हात आहे. विविध मैफली, सांगितिक कार्यक्रमातून देशपरदेशात त्यांचे सूर गुंजत राहिले. […]

भावकवी कृ. ब. निकुंब

कृ.ब.निकुंब यांची ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो. […]

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळाल्यावरही, आपण परिपूर्ण गायक आहोत, असा अहंकार त्यांनी कधीच बाळगला नाही. दररोज त्या गायनाचा रियाज नियमितपणे करीत असत. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घराण्याच्या शिस्तबद्धतेनेच व्हायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. […]

विख्यात व्हायोलीन वादक व गायक पं गजाननबुवा जोशी

विख्यात व्हायोलीन वादक व गायक मा. पं गजाननबुवा जोशी यांचा जन्म ३० जानेवारी १९११ रोजी झाला. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा ह्या तीनही घराण्याच्या गायकीवर एकाच वेळी प्रभुत्व मिळवून त्याच वेळी एक विख्यात व्हायोलीन वादक म्हणूनही किर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त केलेले पं. गजाननबुवा जोशी ह्यांनी शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक गौरवशाली असे स्थान निर्माण केले […]

मराठी भाषेतील कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त

कवि दत्त यांची अलीकडच्या संदर्भात ओळख करून द्यायची झाल्यास ती अशी करून देता येईल. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला. ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांचे ते वडील. कवयित्री अनुराधा पोतदार यांचे आजोबा आणि कवी प्रियदर्शन पोतदार यांचे पणजोबा! महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांनी दत्त यांच्या काव्यगुणांचे रसग्रहण करणारा लेख लिहिला होता. कवीचे अकाली जाणे आणि त्याचे काव्यवैभव यांची […]

व्यंगचित्रकार, चित्रपट समिक्षक श्रीकांत ठाकरे

श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; मा.श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते,ठाकरे कुटुंबीय म्हणजे कलेच्या प्रांगणात रममाण असणारे, सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेतलेले आणि सृजनशील; अर्थात हे संस्कार […]

1 332 333 334 335 336 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..