नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

सुप्रसिध्द अभिनेता सुनील दत्त

सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त होते. त्यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी झाला. सिनेसृष्टीत सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय, दिग्दर्शकसारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास चार दशकांपर्यंत त्यांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे पात्र वास्तविक जीवनाच्या जवळचे असायचे. त्यांचे व्यक्तीमत्वसुध्दा तशाच पात्रांनी प्रभावित राहिले. फाळणीच्या दरम्यान त्यांचे कुटुंबिय भारतात आले होते. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये […]

ख्यातनाम नाटककार, लेखक अशोक पाटोळे

‘आई रिटायर होतेय’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘श्यामची मम्मी’, ‘एक चावट संध्याकाळ’ ही गाजलेली नाटकं, ‘हसरतें’, ‘श्रीमान श्रीमती’ या सुपरहिट मालिका आणि ‘चौकट राजा’, ‘झपाटलेला’ यासारखे सिनेमे आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारणारे अशोक पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांचा जन्म ५ जून, १९४८ रोजी झाला. […]

ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे

गोविंदराव टेंबे अगदी बालवयातच ते संगीताकडे आकर्षित झाले. ते बहुतांशी स्व:शिक्षित पेटी वादक होते. गोविंदराव देवल क्लबला स्व:ताच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जडणघडणीचे श्रेय देत असत. त्यांचा जन्म ५ जून १८८१ रोजी कोल्हापूर येथे झाला. गोविंदरावांनी भास्करबुवा बखले यांच्याकडून कला आत्मसात केली. जयपूर घराण्याचे अल्लादिया ख़ाँ यांच्याकडून वास्तविक त्यांनी कधीच शिक्षा घेतली नाही पण तरीही गोविंदराव ख़ाँसाहेबांना आपला गुरु मानत. गोविंदराव […]

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे

सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले. शांतता कोर्ट चालू आहे, या विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील लीला बेणारे या […]

अभिनेते, संगीत दिग्दर्शक एस. पी. बालसुब्रम्हण्यम

यावर्षी सुब्रमण्यम यांनी चित्रपट सृष्टीतील पाच दशकांची कारकिर्द पूर्ण केली. एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांना SPB किंवा बालू असेही म्हणतात. चाळीस हजाराहून अधिक गाणी गायल्याबद्दल त्यांच्या नावाची गिनीज बुकमध्ये नोंद आहे. त्यांना सहावेळा राष्ट्रीय पुरस्कारासह पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने ही सन्माबनित करण्यात आले आहे. १९६६ मध्ये त्यांनी गायक म्हणून पदार्पण केले. एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांना गिनीज बुक […]

ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतन

निरागस हास्याच्या, अप्रतिम तरीही साध्या सौंदर्याच्या, आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटसृष्टी परिपूर्ण म्हणून नूतनजी ओळखल्या जात. त्यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी झाला.  नूतन यांचे माहेरचे नाव नूतन समर्थ, सासरचे नाव नूतन बेहल. मिलन चित्रपटातलं ‘सावन का महिना’, सरस्वती चंद्र चित्रपटातलं ‘चंदन सा बदन’ , कर्मा चित्रपटातलं ‘दिल दिया है जान भी देंगे’ सुजाता मधलं “जलते है जिस के लिये”, […]

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री बीना रॉय

बीना रॉय या मूळ लखनौच्या होत्या व त्यांनी १९५१ मध्ये ‘काली घटा’ या चित्रपटातील भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. त्यांचा जन्म ४ जुन १९३८ रोजी झाला. त्यावेळी किशोर साहू हे त्यांचे सहकलाकार होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मा.बीना रॉय यांचा विवाह चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे मेहुणे प्रेमनाथ यांच्याशी झाला व त्या कपूर घराण्याचा भाग […]

मराठी चित्रपटसृष्टीचे मामा अशोक सराफ

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म ४ जुन १९४७ रोजी मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले.त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. […]

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मराठमोळे लिओ वराडकर

ब्रिटिशांच्या जुलमातून भारत मुक्त व्हावा यासाठी तुरुंगवास सोसलेल्या वराड (ता. मालवण) येथील वराडकर कुटुंबाचा वंश असलेले लिओ वराडकर हे आज ब्रिटनचा भाग असलेल्या आयर्लंडच्या पंतप्रधान बनले आहेत. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सीमोन कोवनी यांच्याशी झाला. ३८ वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. डबलीग […]

मीनाक्षी शिरोडकर

पहिली मराठमोळी स्वीमसुट गर्ल असे सुद्धा मीनाक्षी शिरोडकर यांना म्हणता येईल. त्यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या का.. लाजता? असं म्हणत जलक्रीडा करणारी अभिनेत्री आठवते ना? मीनाक्षी शिरोडकर यांनी १९३८ मध्ये ब्रम्हचारी चित्रपटात दिलेल्या या बोल्डसीनची चर्चा त्याकाळी रंगली नसती तरच नवल. स्वीमसूटमधील दृश्यामुळे मीनाक्षी यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. रेडिओपासून सुरुवात केलेल्या मीनाक्षी […]

1 337 338 339 340 341 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..