नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक इलाई राजा

इलाई राजा यांचे पूर्ण नाव डॅनिअल राजैय्या. त्यांचा जन्म २ जून १९४३ रोजी झाला. इलाई राजा यांनी १९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे, आपल्या आगळ्यावेगळ्या आणि कर्णमधुर संगीताने रसिकांना वेड लावणार्याअ इलाई राजा यांनी ५ हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषातील ९०० (त्यातील ४५० हुन अधिक चित्रपट तमिळ […]

चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक मणिरत्नम

मणिरत्नम हे चित्रपट सृष्टीत येण्या आधी कंसल्टंट होते. मणिरत्नम यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट १९८३ साली कानडी चित्रपट ‘पल्लवी अनु पल्लवी’. त्यांचा जन्म २ जून १९५५ रोजी झाला. या चित्रपटाला कर्नाटक सरकार ने मणिरत्नम यांना ‘बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड’ दिले. मा.मणिरत्नम यांना १९८६ साली आलेल्या तमिळ चित्रपट ‘मोउना रागम’ ने तमिळ चित्रपट सृष्टीत ओळख दिली. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाले. मणिरत्नम […]

थोर देशभक्त, नामवंत नाटककार वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी

१९१२ साली ’वीर वामनराव’ जोशी यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्यांचा जन्म १८ मार्च १८८१ रोजी झाला. त्या नाटकाने काही काळ मराठी रंगभूमी दणाणून सोडली. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. ‘मी नवबाल जोगीण बनले’ हे त्यातील गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी १९२५ साली त्यांनी ‘रणदुंदुभी’ हे […]

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी’ बाबूराव पेंटर

बाबूराव पेंटर यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांचा जन्म ३ जून १८९० रोजी झाला. १९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी […]

मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार

अजय सरपोतदार यांचे पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. १९७६ साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून १९८१ मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९६० रोजी झाला. चित्रपट क्षेत्रात मात्र त्यांनी दहावीच्या परिक्षेनंतर म्हणजे १९७६ मध्ये काम करायला सुरवात केली. सहायक निर्मिती व्यवस्थापक म्हणून ते काम करू लागले. […]

बॉलीवूडचे ‘शो मॅन’ अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर

लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे हे राज कपूर यांचे स्वप्न होते. राज कपूर यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्कलाब’ चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. अभिनेता होण्यासाठी त्यांनी क्लॅपरबॉय म्हणूनही काम केले आणि केदार शर्मा यांची थप्पडही खाल्ली. दहावीत राज कपूर एका […]

मराठी कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते

कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले […]

बॉलिवूड मधील स्वप्नसुंदरी अशी ओळख असलेल्या नर्गिस दत्त

नर्गिस दत्त यांचे खरे नाव फातिमा राशिद. १९३५ साली त्यांनी तलाश-ए-हक चित्रपटातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. ज्यावेळी त्या सहा वर्षांच्या होत्या. त्यांचा जन्म १ जून १९२९ रोजी झाला. त्यांना बेबी नर्गिस असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केले. १९४३ साली त्यांनी मोतीलाल यांच्यासमवेत वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपट केला. त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार […]

नाटय़समीक्षक डॉ.वि.भा. देशपांडे

डॉ.वि.भा.देशपांडे यांनी मॉडर्न महाविद्यालय तसेच पुणे विद्यापीठात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचा जन्म ३१ मे १९३८ रोजी झाला. नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. डॉ. वि. भा. देशपांडे हे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही विशेषतः नाट्यक्षेत्रात वावरत होते. डॉ. वि. भा. देशपांडे […]

भास्कर रामचंद्र भागवत उर्फ भा.रा. भागवत

त्यांनी मुंबईतील ‘सेंट झेवियर्स महाविद्यालया’तून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी घेतली होती. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक भास्कर रामचंद्र भागवत उर्फ भा.रा. भागवत यांचा जन्म ३१ मे १९१० रोजी इंदूर येथे झाला. लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भागवतांना आवड होती. शालेय जीवनात ‘माय मॅगझिन’ हे पुस्तक/नियतकालिक आणि […]

1 338 339 340 341 342 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..