नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत

तेजस्विनी पंडीत ही रणजित पंडित आणि जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या… तिचा जन्म २३ मे १९८६ रोजी झाला. तेजस्विनी पंडित ने ‘अग बाई अरेच्चा ‘ मधील निगेटिव्ह शेडमधील भूमिकेतून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर सुरु झालेला तिचा प्रवास जाहिरात, चित्रपट,मालिका,नाटक अशा चारही माध्यमात सुरु आहे. भूमिका ग्लॅमरस असो कि सोज्वळ त्या भूमिकेत शिरून त्यावर आपली छाप […]

मराठीतील ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक

मूळचे अकोल्याचे असणाऱ्या आनंद मोडक यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला.  तेथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट धरली. बा. सी. मर्ढेकरांच्या बदकांचे गुपित या काव्याला मा.मोडक यांनी संगीत दिले आणि तेथून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. […]

मराठी नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक संजय मोने

रक्त चरित्र या हिंदी चित्रपट तसेच पक पक पकाक या मराठी चित्रपटातून संजय मोने यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक कायमची आठवण ठाम केली. टाइम बरा वाईट, ‘पेइंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ क्लासमेट्स, अ रेनी डे, मातीच्या चुली, रिंगा रिंगा आणि भो भो या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्वेस्टमेंट’ या पुरस्कार विजेत्या […]

मराठी नाट्य, दूरदर्शन व चित्रपट अभिनेते रवींद्र मंकणी

‘स्वामी’, ‘त्रिकाल’, ‘शांती’ या मालिकेतील विविध भूमिकांसोबत अनेक चित्रपट आणि नाटकातील भूमिका गाजवणारे अभिनेता रविंद्र मंकणी व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी झाला. रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ‘रवींद्र मंकणी’ यांची ‘स्वामी’ या मालिकेत ‘माधवराव पेशवे’ यांची भूमिका […]

जागतिक व्हिस्की दिवस

जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय […]

नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड

गिरीश कर्नाड म्हटलं की ‘तुघलक’ आणि ‘हयवदन’ ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यासमोर येतात. कारण ती बहुसंख्य भारतीय भाषांत भाषांतरीत झाली आहेत. पण या व्यतिरिक्तही त्यांची अनेक नाटके गाजली. शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे, असंही नाही, आपलं बहुतांश लेखन कन्नड मध्ये करणार्याव या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नाही. ती आहे कोकणी. आणि प्राथमिक […]

गानहिरा हिराबाई बडोदेकर

ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फक्त माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी झाला. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याकाळी हिराबाईंच्या रूपाने स्त्रियांसाठी एक नवी वाट मोकळी […]

विजय तेंडुलकर

प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक विजय तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापुर येथे सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडिल कारकून होते. शिवाय प्रकाशनाचा छोटासा व्यवसायही ते चालवायचे. ज्या काळात मुलांना खेळण्याशिवाय इतर काही सुचत नसते अशा वयात अर्थात वयाच्या सहाव्या वर्षी तेंडुलकरांनी आपल्या लेखनास प्रारंभ केला. घरात विखुरलेली पुस्तके हे त्यांच्या लेखनाचे […]

जेष्ठ संगीतकार हंसराज बेहल

हंसराज बेहल यांच्या घरी कोणत्याही प्रकारचे संगीताला पोषक वातावरण नसताना फक्त संगीताची ओढ होती म्हणून त्यांनी अंबाला इथे आचार्य चिरंजीवलाल यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१६ रोजी अंबाला येथे झाला. त्यानंतर काही काळ संगीत शिकवणे, स्टेज प्रोग्राम करणे, काही गाण्यांचे रेकोर्डिंग करणे यामध्ये काही काळ त्यांनी व्यतीत केला. हा सारा अनुभव गाठीशी घेऊन १९४४ साली […]

जागतिक संग्रहालय दिवस

संग्रह म्हटलं की छंद, सामान्य व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे सीमित दृष्टीकोनातून पाहते पण त्याच गोष्टीकडे छंदवेडी व्यक्ती कल्पकतेने पाहते. छंद आयुष्यात उर्जा निर्माण करतो,असे मानणाऱ्या आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणतातरी छंद बाळगायला हवा असे म्हणणारे आमचे मित्र धनंजय बदामीकर यांचा विंटेज कार चा छंद. ‘विंटेज कार’ बाळगणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. याचा अर्थ ही हौस केवळ […]

1 341 342 343 344 345 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..