नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

कार्डियक अरेस्ट

काल सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे ‘कार्डियक अरेस्ट’ च्या कारणाने निधन झाले, हे ऐकून सगळ्यांना शॉक बसला. संपूर्ण देशात पुन्हा चर्चा सुरु झाली की, गेल्या काही काळापासून या कारणाने मृत्यु होणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. कार्डियक अरेस्ट म्हणजे काय? कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक ह्रदयाचे काम करणे बंद होणे होय. विशेष म्हणजे हा आजार दिर्घ काळाचा नसतो, […]

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीसह, प्रेक्षक व मिडीयाची देखील तारांबळ उडते. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली-मोठी सोनाली, सीनिअर सोनाली-ज्युनिअर सोनाली, अप्सरावाली सोनाली-दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावेदेखील त्यांना […]

अभिनेत्री कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई गोखले

स्त्री भूमिका पुरुषांनीच करण्याच्या काळात अशा भूमिका करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई गोखले यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवावत. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. पण घराची हलाकीची अवस्था असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं […]

हिंदी,मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू

रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे.  त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला. एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना  रीमा लागू यांचं नाव सुपरिचित होती. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून […]

मुक्ता बर्वे

मुक्ता बर्वेचे वडील श्री वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरी करत होते, तसेच आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या. मोठा भाऊ देबू बर्वे कमर्शियल आर्टिस्ट आहे तसेच त्याने लहानपणी काही चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. तिचा जन्म १७ मे १९८१ रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे झाला. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. मुक्तावर कलेचे संस्कार लहानपणापासून घरातूनच होत होते. मूळचा […]

लोकप्रिय गझल गायक पंकज उदास

१९८६ साली ‘नाम’ या चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है..’ या गाण्याच्या माध्यमातून पंकज उधास नावारूपाला आले. त्यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी झाला. आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जातात. त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले आहे. पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारं […]

आजचा विषय आमचूर पावडर

आमचूर पावडर म्हणजे कैरी सुकवून केलेली पावडर. कैरी फक्त उन्हाळ्यात उपलब्ध असते. मात्र कैरी पावडर म्हणजेच आमचूर पावडर स्वरूपात साठवली जाऊ शकते. चटकदार आमचूर पावडर ही आमटी व विविध भाज्यांमधून आहारात समाविष्ट केली जाते. आमचूर पावडर हिरव्या किंवा तपकिरी रंगाची असते. आमचूर पावडरचे फायदे आमचूर पावडर पित्त कमी करते व पचनक्रियेला चालना देते. आमचूर पावडरचा आहारात […]

आहारात फायबरचा वापर

फायबर कशात मिळतं? अपचनीय बिया, भाज्यांची आवरणं, फळं आणि धान्यांमध्ये फायबर सापडतं. फायबर हे अपचनीय कार्बोहायड्रेट्सपासून बनतं. त्याचे घटक असतात सेल्युलोज, पेक्टिन, लिगिनन, हेमसिल्युलोज, गम्स, म्युसिलेज आणि ब्रान. फायबरचे दोन प्रकार असतात, द्रवणीय आणि अद्रवणीय. हे दोन्ही फायबर आरोग्य, पचन आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी आवश्यक असतात. द्रवणीय फायबर पाणी खेचून पचनक्रियेदरम्यान जेलमध्ये रूपांतरित होतं. द्रवणीय फायबर […]

कसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे

आंब्याचा सीझन जोरात चालू झाला आहे. उन्हाळ्यातील सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे आंबा आहे. जवळपस सर्वच लोकांना आंबे आवडतात. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होते परंतु त्याच्या रंगावर किंवा सुगंधावर भुलून आंबे विकत घेऊ नका. कारण हे आंबे शेतातून थेट आपल्याला उपलब्ध न होता त्याची साठवणूक केली जाते. यादरम्यान अधिक नफा मिळवण्यासाठी आंबे विक्रेते कॅलशियम कार्बाईड […]

१६ मे – पहिला ऑस्कर पुरस्कार

८८ वर्षापूर्वी १६ मे रोजी पहिला ऑस्कर पुरस्कार दिला गेला. कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत ऑस्कर मिळवण्याकरता चढाओढ लागलेली असते. १६ मे १९२९ रोजी ऑस्कर पुरस्कार म्हाणजेच […]

1 342 343 344 345 346 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..