नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मराठी हिंदी अभिनेत्री अश्विनी भावे

अश्विनी भावे यांनी १४व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९७२ रोजी झाला.अश्विनी भावे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन त्यांनी आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे चित्रपट केले. १९९१ साली ’हिना’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत […]

ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे

सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला.आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी, बॉलिवूड, जाहिराती, हिंग्लिश नाटकं आणि मालिकांमधून रसिकांना निखळ आनंद देणारे, त्यांच्या मनात प्रेमाचं-आदराचं स्थान मिळवणारे आत्माराम भेंडे यांनी, ‘एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते’ म्हणून स्वतःचा ठसा उमटवला होता. रसिकांना हसवण्यासाठी […]

लोककवी मनमोहन नातू

मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९११ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी झाला. शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं […]

इटालियन शिक्षणतज्ञ मारीया माँटेसरी

आपले मुल साडे तीन वर्षाचे झाले की आता माँटेसरीत घालणार असे म्हणतो, माँटेसरी हे नाव एका महान व्यक्तीचे आहे हे खूप कमी जणाना माहित असेल. शाळा प्रवेशाच्या आधीच्या या शिक्षणाची पद्धती शोधून तिची मांडणी करणाऱ्या व त्याचेही ‘विज्ञान बनवणाऱ्या बालमानस-तज्ज्ञ मारीया माँटेसरी. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १८७० रोजी झाला. माँटेसरी यांचे कार्य इतके महान आहे की लहान मुलांच्या शाळेला आता […]

जागतिक अॅकॉर्डियन दिवस

दरवर्षी ६ मे हा दिवस जागतिक अॅकॉर्डियन दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर २००९ पासून हा दिवस साजरा केला जातो परंतु भारतात २०११ पासून अॅ्कॉर्डियन दिन साजरा करण्यास सुरवात झाली. पहिला जागतिक अॅकॉर्डियन दिवस हा पहिला अॅकॉर्डियन १८२९ ला बनविला गेला व त्याचे पेटंट ६ मे १८२९ रोजी व्हिएन्ना येथे ख्रिस्तीफर डिमेनी यांनी घेतले, या […]

रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा

रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. त्यांच्या आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १८७४ रोजी झाला. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, […]

बालकवी ठोंबरे

बालकवी ठोंबरे यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला. बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, […]

जुन्या काळातील जेष्ठ संगीतकार नौशाद अली

नौशाद यांचे लहानपण लखनौमध्ये गेले. ते ज्या ठिकाणी राहायचे त्याच्या बाजूलाच एक थिएटर होतं. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला.पूर्वी चित्रपट चालू असताना त्याचं पार्श्वसंगीत पडद्यासमोर बसलेली मंडळीच द्यायची. घरात बसल्या बसल्या या पार्श्वसंगीताचे सूर नौशाद यांच्या कानांवर पडायचे. यामुळे ते संगीताकडे खेचले गेले. लादनसब हे अशा प्रकारचे संगीत देण्यास माहीर होते. त्यांचा वाद्यवृंद पार्श्वसंगीत देत असताना नौशाद […]

बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी.रानी

बुलो सी रानी यांचे पूर्ण नाव बुलो चंदीराम रामचंदानी. बुलो. सी. रानी यांच्या नावाची हकीगतही रंजक आहे. त्यांचा जन्म ६ मे १९२० रोजी हैद्राबाद पाकिस्तान येथे झाला.सिंधी समाजात जन्माला आलेल्या बुलो चंदी रमानी यांनी आडनावाचं इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ वेगळं काढलं व ‘रमानी’चं ‘रानी’ करून टाकलं. त्यामुळं अनेकांना हा पुरुष संगीतकार की स्त्री संगीतकार असा प्रश्न पडे. मा.बुलो सी रानी यांचे […]

फराळापासून काही नवीन पदार्थ

दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते, उरलेल्या फराळाचं करायचं तरी काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, एक दही-भाताबरोबर चकली होईल, एक दिवस नाष्ट्याला उरलेला चिवडा,शंकर पाळी. उद्या आणि परवा असंच बाकीचंही मार्गी लावायचं, ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत. अशावेळेस फराळापासून काही नवीन पदार्थ बनवून बघा. चिवडा मिसळ साहित्य- मोड आलेली मटकी २ वाट्या, बटाटा १, आले लसूण पेस्ट १ चमचा, […]

1 347 348 349 350 351 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..