नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक मधु मंगेश कर्णिक

आपल्या आगळ्यावेगळ्या व विपुल साहित्यनिर्मितीचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या लेखकांत मधू मंगेश कर्णिक यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे. मधु मंगेश कर्णिक यांचे प्राथमिक शिक्षण करुळ येथील शाळेत १९३८ ते १९४२ पर्यंत झाले. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९३१ रोजी करुळ, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे झाला.तर कणकवली येथे १९४२ ते १९५१ पर्यंत माध्यमिक शिक्षण झाले. इच्छा असूनही त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढे […]

जेष्ठ बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान

जेष्ठ बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान  हे अफगाण वंशाचे होते. त्यांचे वडील अफगाणिस्तानच्या गजनी भागातील तर आई ईराणी होती. फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला […]

मराठी नाटककार, कादंबरीकार, लेखक मामा वरेरकर

भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म २७ एप्रिल १८८३ रोजी झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिले. कोकणात येणार्या नाटक मंडळींशी मामा वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला. वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते […]

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू

शाळेत असल्यापासून आरती प्रभू या नावानेच कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळ येथे झाला. आरती प्रभू यांच्या आईंचे कुडाळला ‘विणा गेस्ट हाऊस ’होतं, आणि खानावळ होती. कोकणातील गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसुन मा.आरती प्रभू कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्या […]

प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी

मौसमी चॅटर्जी यांचे खरे नाव इंदिरा. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९४८ रोजी झाला. १९६७ मध्ये बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या बालिका वधू या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर १९७२ मध्ये रिलीज झालेल्या ‘अनुराग’ या सिनेमाद्वारे मौसमी यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. ‘कच्चे धागे’, ‘जहरीला इंसान’, ‘स्वर्ग नरक’, ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’, ‘मांग भरो सजना’, ‘दासी’, […]

शंकर जयकिशन या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीतील शंकर

शंकर यांचे पूर्ण नाव शंकरसिंग रघुवंशी. शंकर हे पृथ्वीराज कपुर यांच्या पृथ्वी थिएटर या नाटक कंपनीत तबला वाजविण्याचे काम करायचे. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. ते एका गुजराती चित्रपट निर्मात्याकडे संगीत देण्याची संधी मिळते का हे पाहण्यासाठी चकरा मारत होते. तेंव्हा त्यांना जयकिशन नावाच्या तरूण मुलाची गाठ पडली. तोही याच कामासाठी चकरा मारत होता. तो हार्मोनिअम अप्रतिम […]

हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक

प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला आणि शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. […]

शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन निंजा यांचा आवाज – मेघना एरंडे

शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन निंजा अशा कार्टून मागे असलेला आवाज मेघना एरंडे. तिचा जन्म २४ एप्रिल १९८१ रोजी झाला. मेघना एरंडेला आत्तापर्यंत प्रेक्षकांनी अनेक मालिका आणि सिनेमांतून बघितलंय. तिने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर गंमत म्हणून डबिंग करायला लागली. पण नंतर ती तिची पॅशनच बनली. शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन अनेक कार्टून्सना मेघना एरंडे ने आवाज दिला आहे, निंजा तिच्यासाठी टर्निंग पाँइंट […]

महान गायक उस्ताद बडे गुलाम अली खान

लाहोर येथे जन्मलेले बडे गुलाम अली खान फाळणीनंतर तेथेच राहिले. त्यांचा जन्म २ एप्रिल १९०२ रोजी झाला. पहिले काही वर्ष ६ महिने भारत आणि ६ महिने पाकिस्तानात येथे राहत. त्यांनी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याकरता मदतीची विनंती केली. आणि खासाहेब हिंदुस्थानचे नागरिक झाले. मैफलीत खांसाहेबाना अपेक्षित ठेका तबलजीकडून मिळाला नाही कि फक्त ठुमऱ्या गाऊन वेळ मारून नेत. […]

मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार दीनानाथ मंगेशकर

अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण दीनानाथ मंगेशकर यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे मा.दीनानाथ मंगेशकर यांचे गुरू. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला.त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं […]

1 351 352 353 354 355 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..