नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य अभिनेता प्रशांत दामले

प्रशांत दामले यांना मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य अभिनेता म्हणले जाते. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९६१ रोजी झाला. त्याच्या अभिनय कारककिर्दीला एकोणचाळीसहून अधिक वर्षे पूर्ण झाली. या काळात त्याने जवळपास आठ हजार नाटकांचे प्रयोग केले आहेत. मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द १९७८ मध्ये सुरू झाली. ‘टूरटूर’ या मराठी नाटकापासून प्रशांत दामले दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. […]

प्रख्यात विनोदी अभिनेते राम नगरकर

राम नगरकर हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून. तेही एक विनोदी नट प्रख्यात अभिनेते राम नगरकर यांनी मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसविले. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९३० रोजी झाला.‘रामनगरी’ हे त्यांच्या आत्मकथनाचे धम्माल विनोदी पुस्तकही खूप गाजले. महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरविले. ‘रामनगरी’ ला पुलंची प्रस्तावना आहे. त्यामुळेच हे पुस्तक […]

श्रेष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली

आज श्रेष्ठ गायिका मा.किशोरी आमोणकर यांचे निधन झाले. किशोरी आमोणकर यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी झाला. त्यांना आदराने  ‘गानसरस्वती’ असे संबोधले जाई. त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मा.मोगूबाई कुर्डीकर. मा.किशोरी आमोणकर यांनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती मा.रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. […]

१ एप्रिल – ‘एप्रिल फूल’

एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’ म्हणण्याचा प्रघात आहे. […]

१ एप्रिल २००४ – जीमेलचा वाढदिवस

१ एप्रिल २००४ मध्ये पहिल्यांदा “गुगल‘ने जेव्हा ई-मेलच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले, तेव्हा हा “एप्रिल फूल‘चा प्रकार तर नाहीना, अशी शंकाही अनेकांच्या मनाला चाटून गेली. पण, तसे काही नव्हते. जीमेल ही सेवा त्या वेळच्या इतरांपेक्षा निराळी होतीच, शिवाय गुगलचे भक्कम पाठबळ तिच्यामागे असल्यामुळे नवनवीन तंत्रे अवलंबून वापरकर्त्यांला सुखी ठेवण्याची काळजीही घेतली जाणार, एवढी […]

मराठी लेखक आणि झुंझार पत्रकार गणपती वासुदेव बेहेरे

गणपती वासुदेव बेहेरे उर्फ ग.वा. बेहेरे हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक आणि संपादक होते. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. ग.वा. बेहेरे यांचे वडील […]

जागतिक डॉक्टर दिन

आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो. सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध […]

प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी

आनंद बक्षी यांनी लिहीलेली गाणी आजून ही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. त्यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी झाला.आनंद बक्षी, हे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार ओळखले जात होते. भगवानदादांची भूमिका असलेला ‘भला आदमी’ हा चित्रपटापासून गीते लिहण्यास सुरवात केली. हा चित्रपट १९५८ मध्ये प्रदर्शित झाला मात्र त्यापूर्वीच ‘शेर-ए-बगदाद आणि ‘सिल्व्हर किंग’ हे त्यांचे चित्रपट झळकले. शैलेंद्रसारख्या दिग्गज गीतकाराने अनेक निर्मात्यांकडे बक्षी […]

देविका राणी

देविका राणी चौधरी हे देविका राणी यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या ‘लाइट ऑफ एशिया’ या […]

भारतीय सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी

मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लीम परिवारात झाला. आधीच खुर्शीद नावाची मुलगी असल्याने मुलगा व्हावा, अशी तिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. पण मुलगी जन्माला आल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यावेळी तर त्यांच्याकडे डॉक्टरांचे बिल देण्यासाठीही पुरसे पैसे नव्हते. म्हणून जन्मल्यानंतर लहानग्या महजबीनला मुस्लीम समाजाच्या अनाथालयात सोडण्याचे तिच्या जन्मदात्यांनी ठरवले. मात्र अनाथालयाच्या पायरीवर तिला सोडून […]

1 361 362 363 364 365 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..