उत्तम निवेदिका अभिनेत्री रेणुका शहाणे
‘सुरभि’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमाने घराघरांत पोचलेले रेणुका शहाणे हे नाव घराघरात पोचले. त्यांचा जन्म २७ मार्च १९६५ रोजी झाला.त्यांचे ते दिलखुलास हसून ‘नमस्कार’ म्हणणे आजही लोकांच्या कानांत आणि डोळ्यांसमोर आहे. या कार्यक्रमातून त्या एक उत्तम निवेदिका दिसल्या तशी त्यापाठोपाठ आलेल्या मालिकांमधून अभिनय निपुणताही प्रेक्षकांनी वाखाणली. भारतीय दूरचित्रवाणीवर गाजलेल्या मालिकांपैकी अनेक रेणुका शहाणे यांच्या नावावर आहेत. सर्कस, सैलाब, इम्तिहान आदी […]