धृपद-धमाराचे गायक मुकुल शिवपुत्र
मुकुल शिवपुत्र हे पद्मभूषण पंडित कुमार गंधर्व यांचे पुत्र आणि प्रमुख शिष्य आहेत आणि त्यांना भारतीय संगीतातील एक उत्तम गायक मानले जाते. त्यांचा जन्म २५ मार्च १९५६ रोजी झाला. मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले.मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. […]