नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

सई परांजपे

रँग्लर परांजपे यांची नात तर शकुंतला परांजपे यांची कन्या असलेल्या सई परांजपें यांना साहित्याचा आणि लेखनाचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचा जन्म १९ मार्च १९३८ रोजी झाला.त्या शाळेत शिकत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मुलांचा मेवा हे त्यांचे पुस्तक १९४४ साली त्यांच्या वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांचं बरचसं लेखन हे लहान मुलांसाठी लिहिलेलं आहे. त्यांची बालनाट्येही […]

‘चितळे बंधू मिठाईवाले’चे संस्थापक रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे

चितळे कुटुंबीय मूळचे भिलवडी (जि. सांगली) येथील. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९२० रोजी झाला. भास्कर चितळे यांनी १९२० मध्ये सातारा जिल्ह्य़ातील लिंबगोवे या छोटय़ाश्या खेडय़ात दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सात भाऊ आणि पाच बहिणी अशा चितळे यांच्या कुटुंबातील भाऊसाहेब हे ज्येष्ठ असल्याने वडिलांच्यापश्चात तेच आधारस्तंभ झाले. वयाच्या १८ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून त्यांनी वडिलांसोबत दुग्धव्यवसायात पदार्पण केले. […]

लोकप्रिय पार्श्वगायिका अलका याज्ञिक

कोलकात्यामध्ये जन्मलेल्या अलका याज्ञिक यांनी वयाच्या ६व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरूवात केली. १९७२ पासून अलका याज्ञिक आकाशवाणीच्या कोलकाता केंद्रासाठी भजने म्हणत असत. त्यांचा जन्म २० मार्च १९६६ रोजी झाला. वयाच्या दहाव्या वर्षी अलका याज्ञिक यांनी १९८० साली आलेल्या लावारिस ह्या हिंदी चित्रपटामधील तिने म्हटलेले गाणे गाजले होते. परंतु तिला १९८८ सालच्या तेजाब चित्रपटामधील माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या […]

थोर देशभक्त, नामवंत नाटककार वामनराव जोशी

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षक अशी बहुविधता होती. म्हणूनच नाना क्षेत्रातील नाना प्रकारचे लोक त्यांच्या भोवती असायचे. त्यांचा जन्म १८ मार्च १८८१ रोजी झाला. राजकारणाच्या रणधुमाळीत ते अहर्निश उभे होते. त्यामुळे ललित लेखनासाठी फारशी फुरसत त्यांना मिळत नव्हती. तरीही वृत्तपत्रलेखन आणि नाट्यलेखन या दोन्हीमध्ये त्यांचा नावलौकिक मोठा होता. १९१२ साली त्यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्या नाटकाने काही […]

जेष्ठ संगीतकार गुलाम मोहम्मद

बीकानेर राजस्थान येथे जन्मलेल्या मा.गुलाम मोहम्मद यांचे वडील जनाब नबी बक्श हे तबलावादक होते. त्यामुळे गुलाम मोहम्मद यांना संगीताचे जनुक रक्तातूनच आलेले होते. राजस्थानी लोकसंगीताचा त्यांनी आपल्या चित्रपट संगीतात पुरेपूर वापर करून घेतला. ढोलक, मटका, डफ, खंजिरी, चिमटा अशा तालवाद्यांना त्यांनी लोकप्रिय बनवले. अर्थात कोणत्या प्रकारच्या गाण्यात आवाजाला जास्त उठाव द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या गाण्यात वाद्यांचा […]

शशी कपूर

बलवीरराज अर्थातच शशी कपूर हे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा. त्यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकता येथे झाला.घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. बहुतेक लोकप्रिय चित्रपटांमधून शशी कपूर असेच दिसले. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी आणि बघता क्षणी नायिकेला प्रेमात पडायला लावणाऱ्या भूमिका त्यांच्या वाटय़ाला जास्त आल्या आणि त्याच लक्षात राहिल्या. शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईत […]

भारतीय लेखक, पत्रकार खुशवंत सिग

पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, इतिहासकार, संशोधक, विनोदकार, वादग्रस्त लेखक अन् अतिशय सर्जनशील, संवेदनशील माणूस… खुशवंतसिंग यांची ही विविध रूपे. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ रोजी पाकिस्तानात असलेल्या हदली येथे झाला.तब्बल सात दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लेखक तसे विरळेच. खुशवंतसिंग त्यांपैकी एक. वृत्तपत्रांतील स्तंभ असो वा कादंबरी; किस्से असोत की चुटके… प्रत्येक माध्यमांतून ते मैफल रंगवत होते आणि रसिक […]

पी.सी. अलेक्झांडर

पी.सी अलेक्झांडर यांना भारतीय राजकारणात गांधी घराण्याचे विश्वाकसू म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म २० मार्च १९२१ रोजी झाला. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, जिनेव्हा यांचे सहाय्य महासचिव व कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना, श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून रूजू होण्यास बोलावले. इंदिरा गांधी व त्यानंतर राजीव गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून १९८१ ते […]

पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे

राजकुमारी दुबे उर्फ राजकुमारी एक गोड आवाजाच्या पार्श्वगायिका. बोलपटाच्या सुरवातीच्या पार्श्वगायन गायिका म्हणून राजकुमारी दुबे यांना ओळखले जाते. त्या पहिल्या महिला पार्श्वगायिका म्हणून सुद्धा ओळखल्या जात. बाल स्टेज कलाकार म्हणून राजकुमारी यांनी आपले करियरची सुरवात केली १९३३ मधील ‘आंख का तारा’, ‘भक्त और भगवान’, व १९३४ मध्ये आलेल्या लाल चिट्ठी, मुंबई की रानी, ‘शमशरे आलम’ या […]

हृदयविकार आणि पक्षाघात

हृदयविकाराचा झटका येणे आणि पक्षाघात होणे (शरीराचा एक भाग लुळा पडणे) या दोन्ही विकारांचे कारण त्या त्या अवयवाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात रक्तपुरवठ्यास निर्माण झालेला अडथळा हे असते. असा अडथळा निर्माण होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. या कारणांपैकी बरीच कारणे आता शास्त्राला उलगडलेली आहेत. या आजारांचा प्रतिबंध म्हणजे या कारणांचा प्रतिबंध करणे. सर्वच माणसांनी याबाबत जागृत […]

1 366 367 368 369 370 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..