नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

राजा केळकर संग्रहालय

पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. […]

मराठीतल्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर

मालतीबाई बेडेकरांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. त्यांचा जन्म १८ मार्च १९०५ आवास, रायगड येथे झाला. विश्राम बेडेकरांशी १९३८ साली त्यांचा विवाह झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या. ‘महिला सेवाग्राम’शी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सह्रदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दु:खी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या […]

आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे […]

ज्येष्ठ अभिनेते नवीन निश्चल

पुण्याच्या फिल्म अॅ ण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमधून सुवर्णपदक मिळवून नवीन निश्चल ‘सावन भादो’ या १९७० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर झळकले. त्यानंतर ‘संसार’, ‘परवाना’, ‘बुढ्ढा मिल गया’, ‘नादान’, ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’, ‘हँसते जख्म’, ‘धर्मा’, ‘छलिया’, ‘धुंद’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.  त्यांचा जन्म १८ मार्च १९४६ रोजी झाला. दोन पंजाबी आणि सुमारे ८०-९० चित्रपटांतून सुरुवातीला नायक किंवा सहनायक […]

भावगीत गायक दत्ता वाळवेकर उर्फ मास्टर दत्ता

दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकार सुध्दा होते. त्यांचा जन्म ३० मार्च १९२८ रोजी बेळगाव येथे झाला. १९४८ च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळयामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी ’’युध्दाच्या सावल्या’’, ’’लग्नाची बेडी’’ अशा नाटकातून भूमिका केल्या. याच काळात त्यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व, सीताकांत […]

ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले

‘बिब घ्या बिब शिककाई.., परिकथेतील राजकुमारा..गोड गोजिरी लाज लाजिरी.. अशा एकाहून एक अवीट गोडीच्या मराठी व २०० हून अधिक हिंदी गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या कृष्णा कल्ले या मूळच्या कारवारच्या. त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० रोजी झाला. पण त्यांचे वडील कानपूर येथील नोकरीला होते. त्यामुळे त्यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदी भाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या […]

प्रतिभावंत गीतकार वर्मा मलिक

बरकत राय मलिक उर्फ वर्मा मलिक यांचा जन्म १३ एप्रिल १९२५ रोजी फरीदाबाद पाकिस्तानचा येथे झाला. खूप लहान वयात त्यांनी कविता लिहण्यास सुरवात केली, फाळणीनंतर ते दिल्लीत स्थाईक झाले. संगीत निर्देशक हंसराज बहल यांचे भाऊ वर्मा मलिक यांचे मित्र होते त्याच्या मुळे ते मुंबईला आले. पंजाबी चित्रपटापासून वर्मा मलिक यांनी सुरवात केली. बहल यांनी वर्मा को पंजाबी चित्रपट […]

कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक अल्लादिया खाँ

अल्लादिया खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला. मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले. खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. मा.अल्लादिया खाँ यांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ […]

श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत

मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्याच या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला. त्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी झाला.‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ अशी हाक देऊन पृथ्वीला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणार्याक कवी केशवसुत. कवी केशवसुत म्हणजे मराठी कवितेच्या […]

1 367 368 369 370 371 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..