नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

गिटारवादक, गायक, गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते जॉर्ज हॅरिसन

बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून जॉर्ज हॅरिसन यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला.जॉन लेनन, पॉल मॅकर्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या चौघांनी ‘बीटल्स’ या नावानं जे काही सर्वसाधारणपणे केलं, ते मात्र यापेक्षा पुष्कळच सौम्य, मध्यममार्गी बहुसंख्य श्रोत्यांना रुचेल असं होतं. त्यामुळेच ते गाजले. आजही ‘बीटल्स’चे चाहते जगभर पसरलेले […]

मराठी राजभाषा दिवस

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत. इंग्रजी भाषेप्रमाणे […]

वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांची जयंती

आज २७ फेब्रुवारी.  `अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा किनारा तुला पामराला’, असे स्पष्टपणे सांगणारी अजरामर कविता लिहिणाऱ्या कविवर्य मा.कुसुमाग्रजांची जयंती. वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नव असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते […]

हिंदी मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू

एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ […]

चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक संजय लीला भन्साळी

भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला.१९९६ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. आज बॉलीवूडमध्ये संजय […]

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद करणारे पहिले भारतीय गीतकार समीर

आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे” उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा […]

ज्येष्ठ अभिनेते जॉय मुखर्जी

लव्ह इन टोकियो’, “शागीर्द’, “लव्ह इन सिमला’, “जिद्दी’, “एक मुसाफिर एक हसीना’ अशा गाजलेल्या चित्रपटांनी रसिकप्रिय झालेले जॉय मुखर्जी यांचे वडील शशधर मुखर्जी हिंदी चित्रपटनिर्माते होते; अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओ त्यांच्या मालकीचा होता. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९३९ रोजी झाला.”लव्ह इन सिमला’ हा जॉय मुखर्जी यांचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातील “रोमॅंटिक’ नायकाच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झाले. पुढे त्यांच्या वडिलांनी […]

हिंदी चित्रपटातील जेष्ठ अभिनेत्री ललिता पवार

सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी झाला. त्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्यानॆ त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. वयाच्या १२ वर्षापासून चित्रपटांत काम करणाऱ्या मा.ललिता पवार यांची विक्रमी सिनेकारकीर्द एकूण ७० वर्षांची आहे. त्यांनी सुमारे […]

मराठीतील बहुगुणी नायिका आणि गायिका शांता आपटे

”भारतीय सिनेमांमध्ये सामाजिक, स्त्रीप्रधान असे चित्रपट जेव्हा बनू लागले त्यावेळी अनेक गुणी कलाकार या इंडस्ट्रीला लाभले. त्या काळच्या कलाकारांमध्ये असलेल्या असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करता आलं आणि त्यांचं नाव चित्रपटाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले; त्यापैकीच एक नाव होते शांता आपटे. त्यांचा जन्म १९ मार्च १९२३ रोजी झाला. शांता आपटे यांचे वडिल रामचंद्र […]

तलम, तरल, रेशमी आवाजाचा गायक तलत महमूद

तलत या नावातच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२४ रोजी झाला.तलत यांचा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. तलत यांच्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर जास्तच भरेल. कारण बाकी सर्व आवाज हे गायकांचे होते […]

1 375 376 377 378 379 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..