नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

युवा दिवस

भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले. या दिवसाला असं काय महत्व आहे? तर हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती. ” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश मा.स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला. स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि […]

भारतीय शास्त्रीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत हा काही माझा विषय नाही. तानसेन होता आलं नाही, तरी कानसेन मात्र नक्कीच झालो. शास्त्रीय संगीतामधे प्रत्येक रागाची ऐकण्याची वेळ ठरलेली असते. बरेचदा सकाळी ऐकायचा राग जर तुम्ही दुपारी ऐकाल तर तो ऐकतांना काहीतरी बिघडलंय याची जाणीव करून देतो, उगीच काहीतरी चुकल्या सारखं वाटतं. या उलट जर त्या – त्या वेळेसचा राग त्या […]

फेसबुकचा मार्क झुकेरबर्गच्या यशाचे १० मंत्र

अनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता. स्वप्न बघा झुकेरबर्गने एक स्वप्न पाहिले होते, सर्वात श्रीमंत होण्याचे, जगात प्रसिद्ध होण्याचे. त्यासाठी त्याने कष्ट केले. जर तुम्हालाही तसेच यश […]

त्वचाविकार : तीळ, मास, चामखीळ, लांछन

दिवसेंदिवस छोटय़ा छोटय़ा त्वचाविकारांनी पछाडलेले रुग्ण मोठय़ा संख्येने; त्वचा रोग तज्ज्ञांकडे जातात. डॉक्ट रवैद्यांकडेही येतात. काळे, वेदनारहित व तिळांसारखे जे त्वचेवर डाग उठतात त्यांस ‘तिलकालक’ म्हणतात. तेच जाड व उंच असल्यास त्यांस ‘मस’ म्हणतात. मसापेक्षांहि उंच, पांढरे वा काळे असतात त्यास ‘चामखीळ’ म्हणतात. जन्मत: काळा/पांढरा व त्वचेबरोबर जो वाटोळा डाग असतो त्यास ‘लांछन’ म्हणतात. या सगळ्या […]

व्हॅसलिनचे उपयोग

हिवाळ्यात आपण ड्राय स्किनसाठी व्हॅसलिनचा वापर करतो. परंतु या एका व्हॅसलिनचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो. फक्त पध्दती बदलावी लागेल. रात्री झोपण्या अगोदर पापण्यांवर व्हॅसलिन लावून झोपा. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तुमच्या पापण्या लांब आणि दाट होतील. रात्री झोपताना पायाला व्हॅसलिन लावून झोपा आणि त्यावर सॉक्स घाला. सकाळ पर्यंत तुमचे पाय सॉफ्ट होतील. तुमच्या कोपरांवर […]

सात्विक आहार का घ्यावा

ऍसिडिटी मानवी जीवन खूप धावपळ आणि ताणतणावाने ग्रासलेले आहे. प्रत्येक माणूस नोकरीधंद्याच्या निमित्ताने करिअरच्या मागे धावत आहे. असे हे छोटे-मोठे ताणतणाव, चिंता याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचा वापर, जेवणाच्या अनियमित वेळा यामुळे आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो. आम्लपित्त दीर्घकाळ पाठपुरावा करणारा आजार. भरपूर प्रमाणात तिखट – तेलकट सेवन, जास्त मद्यपान, जड जेवण, अतिचिंता व झोपेचा अभाव […]

४ फेब्रुवारी – फेसबुकचा स्थापना दिवस

इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे. आज ४ फेब्रुवारी रोजी या सोशल नेटवर्किंग साइटला १३ वर्षे पूर्ण होत असताना फेसबुक […]

पु.ल.देशपांडे यांनी भीमसेन जोशी यांची घेतलेली मुलाखत

पु.ल. : ‘घराणं’ या विषयावर तुमचं काय मत आहे? भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य […]

श्रीनिवास खळे आणि दोन भारतरत्ने

मा.श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असत, त्यामुळे खळे यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ? त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर […]

भावकवी गंगाधर महांबरे

गंगाधर महांबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला. पुढे ते पुण्यास राहू लागले. ‘पश्चिमा’ पुणे नियतकालिकाचे कार्यकारी संपादक झाले. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ या पारुजी नारायण मिसाळ यांच्या पाक्षिकात त्यांच्या बालकथा, कविता आणि अन्य लेख प्रसिद्ध व्हायचे. पुढे ही लेखनाची आवड वाढत गेली. त्यांनी पुण्याला गेल्यावर वृत्तपत्रव्यवसायास सुरुवात केली. पुढे […]

1 383 384 385 386 387 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..