नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकर

शिल्पा शिरोडकरची बहीण नम्रता, शिल्पा व नम्रताची आजी मीनाक्षी शिरोडकर- त्यांनी त्यांच्या तरुणपणी स्क्रीनवर स्वीमिंग सूट घालून मराठी समाजाला चांगलंच हादरवलं होतं. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९७२ रोजी झाला. सर्वसामान्य स्त्रिया बिकिनीला सरावल्या नसल्या, तरी भारतीय चित्रपटात मात्र बिकिनीचं मुबलक दर्शन घडलं आहे. सर्वप्रथम स्वीमसूट परिधान करण्याचा मान जातो नम्रता शिरोडकरची आजी मीनाक्षी शिरोडकर यांना. त्यांनी ‘ब्रम्हचारी’ या चित्रपटात ‘यमुनाजळी […]

चित्रपट निर्माते, लेखक, संपादक विजय आनंद

विजय आनंद यांना गोल्डी म्हणून सुद्धा ओळखले जायचे. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९३४ रोजी झाला. १९५४ साली दिल्ली येथे अखिल भारतीय महाविद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये एक नाटक करण्यात आले. नाटकाचे दिग्दर्शन करणारी आणि नाटकामध्ये दिग्दर्शकाची भूमिका करणारी व्यक्ती एकच होती. दोन्हींसाठी पहिले पारितोषिक पटकावणारे मा.विजय आनंद हे देव आनंद आणि चेतन आनंद यांचे लहान भाऊ. मुंबईत आल्यानंतर विजय आनंद यांनी […]

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन

त्यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले […]

हिंदी चित्रपटातील यशस्वी आणि चर्चेतील अभिनेत्री गीता बाली

जन्म:१९३० गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला […]

थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले

शांताराम आठवले यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९१० रोजी झाला. शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. “बेबंदशाही,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्र मैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते […]

चाळिशी गाठल्यावर काय खाल?

चाळिशीपर्यंत सगळेच जण आरोग्याकडे दुर्लक्षच करीत असतात. चाळिशी पार केली की मग मात्र शरीर धोक्याची घंटा वाजवायला लागतं. ती वेळेवर ऐकली आणि आहाराविहारात वयानुरूप बदल केले तर पुढचे अनेक धोके टाळता येतात. दिवसेंदिवस मानवी जीवन खूपच वेगवान, धावपळीचे होत चालले आहे. एक काळ शहरी व ग्रामीण, जीवनात खूप वेग नव्हता; ‘वाघ मागे लागल्यासारखी’ धावपळ नव्हती; रात्रपाळी […]

अजीर्ण

न जीर्यती सुखेनान्नं विकारान् कुरुते डपिच | तदजीर्णमिति प्राहुस्तन्म्ला विविध रुजः | सेवन केलेल्या आहाराचे सम्यक् परिणमन (पचम) न होता तो अपक्वावस्थेतच राहणे म्हणजे अजीर्ण होय. अगिमांद्यजनीत हे अजीर्ण विविध प्रकारच्या रोगांचे कारण होऊ शकते. ‘डॉक्टर, मला अजीर्णाचा त्रास आहे.’ अशी तक्रार प्रत्येक डॉक्टरांकडे घेऊन दिवसांतून एखादा तरी रुग्ण सर्रास पहायला मिळतो. साधारण २५ टक्के तरी […]

नाचता नाचता व्यायाम

एरोबिक्स, बॉलीवूड डान्स आणि झुंबा..सध्या हे व्यायामप्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत. मुळात होऊन जाणार ही संकल्पनाच आकर्षक आणि मजेशीर वाटावी अशी आहे. एरोबिक्स सत्तरच्या दशकातच परदेशात एरोबिक्स लोकप्रिय होऊ लागले होते. त्यानंतर लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या गरजेनुसार इतर प्रकार शोधून काढायला सुरुवात केली. झुंबा असो की बॉलीवूड डान्स. सगळ्याचा पाया एरोबिक्स हाच! एरोबिक्स म्हटलं की म्हणजे तालबद्ध कवायत […]

बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपची अभिनेत्रीं परवीन बाबी

गुजरातच्या जुनागढमधील एका मध्यम वर्गीय मुस्लिम कुटूंबात परवीन जन्माला आली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल, १९४९ रोजी झाला. तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. परवीन यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादेत झाले. इंग्लिश साहित्यात तिने मास्टर्स पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली होती. तिचे इंग्लिश अगदी अस्खलित होते, परवीन वली मोहम्मद खान बाबी उर्फ परवीन बाबी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक […]

सरहद्द गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान

सरहद्द गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान ज्यांना बादशाह खान म्हणूनही ओळखले जाते, हे वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा जन्म ३ जून १८९० रोजी झाला. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये ‘खुदा ई खिदमतगार’ नावाची संघटना उभारली होती. भारत सरकारने १९८७ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवले गेले. बादशाह खान उर्फ […]

1 389 390 391 392 393 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..