हार्मोन्स म्हणजे काय?
मानवी शरीर हे अनेक संस्थांनी बनलेले आहे. या विविध शरीर संस्थांचे नियंत्रण दोन संस्था करत असतात. एक म्हणजे मज्जासंस्था (मेंदू, मज्जारज्जू इ.) आणि दुसरी म्हणजे अंतस्त्रावी ग्रंथी संस्था म्हणजेच एंडोक्राईन सिस्टीम या ग्रंथीमधील स्त्रावांचे स्त्रवण सरळ रक्तामध्ये होत असल्याने या ग्रंथींना अंतस्त्रावी ग्रंधी म्हटले जाते. अशा अंत:स्त्रावी ग्रंथीच्या स्त्रावामधील जे रासायनिक पदार्थ रक्तामध्ये संपूर्ण शरीरात फिरत […]