नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

कर्मयोगी बी. व्ही. परमेश्वर राव

आत्म निर्भर हा शब्द कोव्हीड साथीने आपल्यात रुजवला.पण ही संकल्पना ४०वर्षांपूर्वीच यांनी विशाखापट्टणम जिल्ह्यातील ५०हून अधिक खेडी आत्मनिर्भर करुन ही कल्पना वास्तवात येऊ शकते याचा भक्कम पुरावा दिला होता. अमेरिकेत संशोधन किंवा नोकरीची संधी सोडून मायभूमीत परतून देशसेवा करण्याचा पर्याय निवडल्याबाबत त्यांनी जराही खंत नव्हती. कारण त्यांचे ध्येय पक्के होते. दृष्टी ठाम होती, त्यामुळेच ते असामान्य होते. […]

इंग्लंडचे डावखुरे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवुड

सुनील गावस्कर हे डेरेक अंडरवुड यांची १२ वेळा ‘शिकार’ठरले होते. डेरेक अंडरवुड यांची गोलंदाजी इतकी सफाईदार होती की, त्यांनी आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकला नाही. […]

पखवाज वादक गोविंद भिलारे

तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुशिष्य परंपरेमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. भिलारे यांनी भारतभरात वेगवेगळ्या सुप्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये पखवाज सोलो वादन केले होते, तसेच त्यांनी पंडित जसराज, राहुल शर्मा, उल्हास पं. कशाळकर अशा दिग्गजांना साथ दिली होती. […]

मराठी समीक्षक व विचारवंत दिनकर केशव बेडेकर

नवकाव्य”,”नवकथा”,”सौंदर्यमीमांसा”,”अस्तित्ववाद”,”चित्रकलेतील नवप्रवाह” अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुध्दीचा व तात्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थ सुध्दा रसिकां पर्यंत पोहोचविला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. […]

अभिनेता गश्मीर महाजनी

मराठीमध्ये काम करता करता ‘पानीपत’ या बिग बजेट ऐतिहासिक हिंदी चित्रपटामध्ये गश्मीर महाजनीने एका वीर मराठा योद्धाची भूमिका केली होती. गश्मीर महाजनीने आपल्या वडिल रवींद्र महाजनी यांच्या बरोबर ‘पानिपत’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. गश्मीरने ‘जनकोजी शिंदे’ तर रवींद्र महाजनी यांनी ‘मल्हारराव होळकरांचे’ काम केले आहे. […]

ज्येष्ठ वृत्तनिवेदक – सूत्रसंचालक प्रदीप भिडे

गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज व प्रसन्न मुद्रा असलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक.  […]

संशोधक, समीक्षक डॉ. सखाराम गंगाधर मालशे

एस. एन. डी. टी. महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असणार्‍या डॉ.मालशे यांनी फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्त पुराणावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ आणि ‘मराठी संशोधन पत्रिके’चे ते संपादक होते. […]

ज्येष्ठ तबलावादक हेमकांत नावडीकर

हेमकांत नावडीकर यांनी २६ एप्रिल २०२० रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘संगीत संवाद रेडिओ’ या ‘इंटरनेट रेडिओ’ला सुरवात केली आहे. संगीत संवाद या इंटरनेट रेडिओवर २४७ शास्त्रीय संगीत ऐकता येते. याला जगभरातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. श्रोत्यांकडून तर त्याला उत्तम प्रतिसाद आहेच, पण कलाकारांकडून ही उत्तमोत्तम ध्वनिमुद्रणे उपलब्ध करून देण्यात त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. […]

जागतिक अन्नसुरक्षा दिवस

अन्न सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याचबरोबर उपासमारीची समस्या दूर करतं.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India-FSSAI) ने राज्यांद्वारे सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्नासाठीच्या संदर्भात पहिले राज्य अन्न सुरक्षा इंडेक्स (State Food Safety Index-SFSI) विकसित केले आहेत. […]

कोकणातील उभारता गायक कुणाल भिडे

देवरूख येथील अक्षय पाटील याने बनवलेल्या ‘अजाण’या लघुपटाला कुणालने आपल्या मित्रांच्या सोबत संगीत दिले आहे. हा लघुपट नाशिक येथील फेस्टिव्हल मध्ये दाखवला गेला होता. […]

1 40 41 42 43 44 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..