पहिला क्रिकेट विश्वचषक
पहिल्याच सामन्यात भारताने अभूतपूर्व असा पराक्रम केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ६० षटकांत भारतीय गोलंदाजांना धू धू धूत ४ बाद ३३४ धावा केल्या. यात डेनिस अमिसचे शतक आणि कीथ फ्लेचरचे अर्धशतक होते. दोघांनी अनुक्रमे १३७ (१४७) आणि ६८ (१०७) धावा केल्या. पण शेवटच्या षटकांत माईक डेनिस आणि ख्रिस ओल्ड यांनी तुफान फटकेबाजी केल्याने इंग्लंड ३००च्या पलीकडे पोचले. डेनीसने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या तर ओल्डने ३० चेंडूत तब्बल ५१ धावा केल्या. […]