नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

शंकर जयकिशन या संगीतकार जोडीतील जयकिशन

आज १२ सप्टेंबर….शंकर जयकिशन या संगीतकार जोडीतील जयकिशन यांची पुण्यतिथी जयकिशन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल होते. जयकिशन यांचे हार्मोनियम वरती उत्तम प्रभुत्व होते. त्यांच्या या छंदाला नवीन आकार देण्याच्या वेडापोटी ते मुंबई सारख्या मायानगरी मध्ये आले. शंकर (पूर्ण नाव शंकरसिंह रघुवंशी) यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम […]

मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब – पद्मा चव्हाण

आज १२ सप्टेंबर..  लोकप्रिय मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांची पुण्यतिथी त्यांचा जन्म दि. ७ जु्लै १९४८ रोजी झाला… पद्मा चव्हाण या मराठी  नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणार्‍या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब‘ असे छापलेले असे. पद्मा चव्हाण यांचे १२ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले. — संजीव वेलणकर, पुणे. ९४२२३०१७३३ […]

हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व

आज १२ सप्टेंबर… हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व यांची पुण्यतिथी सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी झाला. ‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व […]

आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल

आज ११ सप्टेंबर..  सुप्रसिद्ध मराठी कवी आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांची जयंती कवी अनिल यांचा जन्म ११ सप्टेंबर  १९०१ रोजी झाला. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी १० चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कोलकातायेथे प्रयाण केले. त्यांना अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी मिळाली. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय […]

भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे

आज ११ सप्टेंबर.. थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे याी जयंती. विनोबाजींचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्‍या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले. त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. […]

कवी अनिल यांच्या २ कविता

जुई पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती   आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला   तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे   कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत शुभ्र […]

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पंजाबी आणि हिंदी कवयित्री अमृता प्रीतम

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९  रोजी झाला. अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील […]

प्रज्ञावंत, प्रतिभावंत संगीतकार व गायक श्रीधर फडके

मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं […]

आशा भोसले यांच्याबद्दल आगळीवेगळी माहिती..

आशाताईंच्या गाण्याबद्दल आपण सगळेच जाणतो. त्या उत्तम जेवण सुध्दा बनवतात.  आशा भोसले यांनी दहा वर्षांपूर्वी “आशाज रेस्टॉरंट प्रा.लिमिटेड” या नावाने हॉटेल व्यवसायाची मुर्हूतमेढ रोवली  व आशाज् हे खास भारतीय पदार्थांचे हे रेस्टॉरंट त्यांनी दुबईत सुरू केले. त्यानंतर आबूधाबी, कतार,कुवेत, बहारीन, इजिप्त, ब्रिटन या देशांतही या कंपनीच्या शाखा काढण्यात आल्या. विशेष म्हणजे आशाताईंनी स्वतःच्या खास रेसिपीज या […]

८ सप्टेंबर

भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा […]

1 432 433 434 435 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..